राजकारणात मुरलेल्या अजितदादांची आमदार निलेश लंकेंकडून दिशाभूल

अजित पवार म्हणाले, “निलेश लंकेने अपक्ष म्हणून सांगितलेले नगरसेवक राष्ट्रवादीत घेतले, पण ते शिवसेनेचे असल्याचे नंतर कळले”


विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पक्के मुरलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बाबतीत एक अविश्वसनीय राजकीय गोष्ट घडली. पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी ५ अपक्ष नगरसेवकांना राष्ट्रवादीत घ्यायचे असे अजित पवारांना सांगितले. पण प्रत्यक्षात ते शिवसेनेचे निघाले.

अजित पवारांनीच पत्रकार परिषदेत हा अजब खुलासा केला. नगरसेवकांच्या पक्ष प्रवेशावरून झालेल्या वादावर अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले, “मी बारामतीमध्ये होतो, तिथे पारनेरचे आमदार निलेश लंके आले.

त्यांनी काही अपक्ष नगरसेवक आपल्या पक्षात घ्यायचे आहे, असे सांगितले. मी त्यांचे पक्षात स्वागत केले. पण हे नगरसेवक शिवसेनेचे होते, हे मला नंतर कळले. याबाबत मी विचारणा केली असता ते भाजपमध्ये जात होते, असे मला सांगण्यात आले.”

आम्ही आघाडीमध्ये एकत्र आहोत, तेव्हा एकमेकांचे सदस्य फोडायचो नाही. आता तीन पक्षांनी एकमेकांचे पदाधिकारी फोडू नयेत, म्हणून मी निलेश लंकेला परत बोलावले. नगरसेवक परत शिवसेनेत पाठवले. पण मुख्यमंत्री नाराज नव्हते, अशी मखलाशीही अजित पवारांनी केली.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*