बंगालमधील कार्यक्रमात दिसला political bitterness; पंतप्रधानांसमवेत व्यासपीठावर बसणे ममतांनी टाळले, पण भाजपलाही तेच हवे होते का?


विशेष प्रतिनिधी

हल्दिया – पश्चिम बंगालमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमात आज political bitterness अर्थात राजकीय वैरभाव दिसला. तो जसा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दाखविला, तसाच तो पंतप्रधानांच्या कार्यक्रमात भाजपनेही दाखविल्याचे दिसले.politicalbitterness in west bengal, mamata banerjee skips program with PM narendra modi

एरवी विकास कार्यक्रमांमध्ये विरोधी पक्षांचे असले तरी मुख्यमंत्री, प्रोटोकॉल मंत्री पंतप्रधानांच्या कार्यक्रमात उपस्थित असतात. हे नेते डेकोरम पाळून तेथे भाषणे करतात. क्वचित एकमेकांवर स्तुतीसुमने देखील उधळतात. अगदी पंतप्रधान एखाद्या राज्यात आपल्या पक्षाच्या प्रचारासाठी जातात त्यावेळी त्या राज्याचे मुख्यमंत्री पंतप्रधानांचे विमानतळांवर औपचारिक स्वागत करून आपल्या नियोजित कार्यक्रमांना निघून जातात.पण पश्चिम बंगालमध्ये आज असे घडताना दिसले नाही. निदान सरकारी कार्यक्रमात तरी दिसले नाही. हल्दियाच्या चार विकास प्रकल्पांच्या लोकार्पण कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री या नात्याने ममता बॅनर्जी यांना केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने निमंत्रण दिले होते. ममता बॅनर्जी यांनी हजेरी लावणेही अपेक्षित होते. पण ममता दीदी आल्या नाहीत. एकतर त्यांच्या गाठीशी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंतीच्या कार्यक्रमाचा अनुभव होता. त्यावेळी पंतप्रधान व्यासपीठावर असताना ममतांना डिवचण्यासाठी जय श्रीरामच्या घोषणा देण्यात आल्या. ममतांनी तेथील लोकांना थोडक्यात सुनावत भाषण केले नाही. वास्तविक प्रोटोकॉल म्हणून त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या होत्या. पण पंतप्रधानांपासून त्यांनी अंतरही राखले होते.

आजच्या पंतप्रधानांच्या कार्यक्रमाची भाजपने रचनाच अशी केली होती, की पंतप्रधानांचा आसाममधला कार्यक्रम झाला. त्यानंतर बंगालमध्ये हल्दियामध्ये भाजपचा मोठा मेळावा घेतला. त्यात पंतप्रधानांनी ममता सरकारवर सडकून टीका करून घेतली. ममतांना बरेच सुनावून घेतले. ममता सरकार उखडून टाकण्याचे आवाहन केले. त्यानंतर पंतप्रधान सरकारी कार्यक्रमाला गेले. म्हणजे एकीकडे ममतांवर स़डकून टीका केल्यानंतर लगेच होणाऱ्या सरकारी कार्यक्रमा ते ममतांच्या शेजारी सरकारी कार्यक्रमात बसणार होते. अशा वेळी सरकारी कार्यक्रमाला ममता बॅनर्जी येतील आणि पंतप्रधानांच्या शेजारी बसतील, ही राजकीयदृष्ट्या अपेक्षितच नव्हते. त्यानुसार ममता कार्यक्रमाला आल्याच नाहीत. यातून भाजपला किंबहुना पंतप्रधानांना राजकीयदृष्टीने जे साध्य करायचे होते, ते घडले… पण या सगळ्यात पश्चिम बंगालमध्ये political bitterness अर्थात राजकीय वैरभाव किती टोकापर्यंत पोहोचला आहे, हे या निमित्ताने स्पष्ट झाले… त्यात पंतप्रधानपदावरची व्यक्ती देखील सहभागी झाल्याचे दिसले…!!;

politicalbitterness in west bengal, mamata banerjee skips program with PM narendra modi

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती