नेपाळमध्ये राजकीय भूकंप, पंतप्रधान ओली यांची पक्षातून हकालपट्टी; नेपाळी कम्युनिस्ट पार्टीचे बंडखोर आक्रमक


वृत्तसंस्था

काठमांडू : नेपाळचे काळजीवाहू पंतप्रधान आणि नेपाळी कम्युनिस्ट पार्टीचे वरिष्ठ नेते के.पी ओली यांची पक्षातील बंडखोर गटाने हकालपट्टी केली आहे. त्यामुळे नेपाळमध्ये राजकीय भूकंप झाला आहे. Political quake in Nepal expulsion of Prime Minister Oli from the party

नेपाळी कम्युनिस्ट पार्टीच्या बंडखोरांच्या केंद्रीय समितीची बैठक झाली. त्यावेळी बंडखोर गटाने ओली यांचे पक्ष सदस्यत्व रद्द करत असल्याची घोषणा केली. या संदर्भातील माहिती बंडखोर गटाचे प्रवक्ते नारायण काजी श्रेष्ठ यांनी दिली आहे.पंतप्रधान ओली आणि नेपाळी कम्युनिस्ट पार्टीचे नेते पुष्पकमल दहल उर्फ प्रचंड यांच्यात पक्ष वर्चस्वातून वाद आहेत. या वादातून पक्षात अगोदरच फूट पडली आहे. तसेच संसदसुद्धा भंग झाली होती. ओली यांचा निर्णय बंडखोर गट आणि दहल यांना सुद्धा पटलेला नाही . आता सार्वत्रिक निवडणूक होत असल्याने पक्षातील गटबाजी उफाळून आली आहे. त्यातून ओली यांची पक्षांतून हकालपट्टी झाली आहे.

Political quake in Nepal expulsion of Prime Minister Oli from the party

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था