दिल्लीतून देवेंद्र फडणवीसांचा पुढचा धमाका; काही इंटरसेप्टेड फोन कॉल्स मुख्यमंत्र्यांनीही ऐकलेत!!; ६.३ जीबी डेटा केंद्रीय गृह सचिवांकडे सोपविला

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली – महाराष्ट्रातील पोलीस बदली आणि पोस्टिंग रॅकेटचा पर्दाफाश करणारा ६.३ जीबी डेटा केंद्रीय गृह सचिवांना तपासासाठी दिल्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीतून पुढचा धमाका केला आहे. police transfers and posting racket; devandra fadanavis hands over 6.3 GB data to home secretery for CBI inquiery

जो ६.३ जीबी डेटा तपासासाठी गृह सचिवांना दिला आहे, त्यात काही इंटरसेप्टेड कॉलचा डेटाही आहेत. त्यापैकी काही कॉल्स स्वतः मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी ऐकले देखील आहेत, अशी आपली माहिती असल्याचे फडणवीस यांनी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना सांगितले.गृह सचिवांना बंद लिफाफ्यात पुरावे

संध्याकाळी फडणवीसांनी दिल्लीत केंद्रीत गृहसचिवांची भेट घेऊन त्यांना सर्व कागदपत्र आणि पुरावे दिले आहेत. त्या विषयी पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले, की “माझ्याकडे असलेले सगळे पुरावे मी बंद लिफाफ्यात गृहसचिवांना दिले आहेत. माझ्याकडच्या पूर्ण माहितीची ब्रीफिंग मी त्यांना दिली आहे. या प्रकरणाची सीबीआय चौकशी केली जावी अशी मागणी मी केली आहे. त्यांनी मला सांगितलेय की या सर्व गोष्टी पाहून सरकार त्यावर योग्य ती कारवाई केली जाईल.

तत्कालीन डीजीपींनी सांगितले होतं की सीआयडीकडून याचा तपास केला गेला पाहिजे. पण ती देखील केली गेली नाही. कुणाला उघडे पडण्यापासून सरकार वाचवत होते. माझा विश्वास आहे की केंद्र सरकारकडून यावर योग्य ती कारवाई केली जाईल.”

देवेंद्र फडणवीस म्हणाले, की “आवश्यकता पडली, तर आम्ही या प्रकरणात न्यायालयातही जाऊ. फोन कॉल टॅपिंग बेकायदेशीरपणे केले गेले, हे नवाब मलिक यांनी जे म्हटले आहे, ते पूर्णपणे खोटे आहे. गृह खात्याच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या परवानगीने हे फोन कॉल्स इंटरसेप्ट केले गेले. माझी माहिती अशी आहे की यातले काही इंटरसेप्टेड कॉल्स खुद्द मुख्यमंत्र्यानी ऐकले आहेत. अर्थात ही माहिती फार संवेदनशील असल्यामुळे मी ती जाहीर करू इच्छित नाही”, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

police transfers and posting racket; devandra fadanavis hands over 6.3 GB data to home secretery for CBI inquiery

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*