देवेंद्र फडणवीसांचा धमाका कोणा-कोणाला “घेऊन जाणार”??; ६.३ जीबी डेटामध्ये आहे काय?? कोणा-कोणाची संभाषणे??, मुख्यमंत्र्यांनी कोणा-कोणाच्या कृष्णकृत्यांवर पांघरूण घातलेय??

विशेष प्रतिनिधी

मुंबई  : पोलीस दलातीत बदल्यांच्या रॅकेटच्या तारा वांद्र्यापासून कुठपर्यंत जुळल्या आहेत… माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ताब्यातील ६.५० जीबी डेटामध्ये आहे काय… ते कोणा-कोणाला घेऊन जाणार… याचीच धमाकेदार चर्चा राज्यभर सुरू झाली आहे. २५ ऑगस्ट २०२० चे कमिशन इंटेलिजन्सचे रश्मी शुक्लांचे पत्र – त्याला सुबोध जैस्वालांनी दिलेले उत्तर,police transfer – posting raket; devendra fadanavis exposed uddhav thackeray – anil deshmukh

थेट मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंपर्यंत पाठविलेला अहवाल… त्यावर कारवाई न करता तो गृहमंत्र्यांकडेच पाठविण्याचा उद्योग हे सगळे देवेंद्र फडणवीसांनी एक्सपोज केलेय… त्याचा तारा कुठपर्यंत गेल्यात… त्याच्यातून कोणा-कोणाची नावे बाहेर येणार… कोण-कोण जाणार… याची उत्तरे सीबीआयने चौकशी केली तर मिळण्याची शक्यता आहे.देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषदेच्या दुसऱ्या पार्टमध्ये पोलीसांच्या बदली रॅकेटवर झगझगीत प्रकाश टाकला. ते म्हणाले, की “गुप्तचर विभागाच्या आयुक्तांना पोलीस दलात बदल्यांसाठी रॅकेट कार्यरत असल्याची माहिती मिळाली होती. त्यासाठी थेट अधिकाऱ्यांशी बोलणी सुरू होती. ही बाब गंभीर असल्याचे लक्षात आल्यानंतर गुप्तचर विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांनी पोलीस महासंचालकांना ही माहिती दिली.

पोलीस महासंचालकांनी केंद्रीय गृहमंत्रालयाला विनंती करून या सर्व लोकांच्या कॉल इंटरसेप्शनची परवानगी मागितली होती. ही परवानगी मिळाल्यानंतर कॉल रेकॉर्डिंगमध्ये स्फोटक माहिती समोर आली. बदल्यांच्या रॅकेटमध्ये अनेक मोठे अधिकारी आणि राजकारण्यांची नावे समोर आली होती,”

रश्मी शुक्ला यांनी २५ ऑगस्ट २०२० रोजी ही माहिती पोलीस महासंचालकांना दिली. २६ तारखेला पोलीस महासंचालकांनी ही माहिती तत्कालीन अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना पाठवली. या सगळ्या प्रकाराची सीआयडीकडून चौकशी होणे गरजेचे आहे, असे पोलीस महासंचालकांनी आपल्या अहवालात म्हटले होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याविषयी समजल्यानंतर त्यांनीही चिंता व्यक्त केली. मात्र, यावर कारवाई करण्याऐवजी हा अहवाल त्यांनी गृह विभागाकडे पाठवला. ही माहिती बघितल्यानंतर गृह मंत्रालयाने कारवाई करणे सोडाच, पण गुप्तचर विभागाच्या तत्कालीन आयुक्तांनाच शिक्षा केली. त्यांना अपेक्षित बढती मिळाली नाही. त्यानंतर गुप्तचर विभागाच्या डेटामध्ये नमूद केल्याप्रमाणेच पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या, असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला.

“पोलिसांच्या बदल्यांमधील रॅकेटच्या घोटाळ्यावर मुख्यमंत्र्यांनी पांघरुण घातले. पोलिसांच्या बदल्यांच्या घोटाळ्यांसंदर्भात फोन टॅपिंगचा ६.३ जीबी इतका डेटा माझ्या हातात लागलेला आहे. या प्रकरणी पोलिस महासंचालकांनी ताबडतोब कारवाई करण्याचा सल्ला मुख्यमंत्र्यांना दिला. परंतु २५ ऑगस्ट २०२० पासून आत्तापर्यंत काहीच कारवाई झाली नाही. हा अत्यंत लाजिरवाणा प्रकार आहे. मुंख्यमंत्र्यांनी कारवाई का केली नाही, उलट हे गृहमंत्र्यांकडेच का पाठविले. मुख्यमंत्र्यांनीच या सगळ्यावर पांघरुण घातलेय,” असा आरोप फडणवीस यांनी केला आहे.

police transfer – posting raket; devendra fadanavis exposed uddhav thackeray – anil deshmukh

 

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*