Rashmi Shukla reoprt; हा महादेव इंगळे कोण?; इंगळे – सोन्याच्या चेनमधले पोवळे यांचा संबंध काय??; २९ अधिकाऱ्यांच्या बदल्या??; एका पोस्टिंगचा रेट ४० – ५० लाख रूपये??

विशेष प्रतिनिधी

मुंबई – वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी तयार केलेला पोलीस बदली आणि पोस्टिंगसंदर्भातील कथित रिपोर्ट सोशल मीडियातून व्हायरल झाला असून या कथित रिपोर्टमधून महादेव इंगळे या बदली एजंटाचे नाव पुढे आले आहे. तसेच तो प्रत्येक बदली – नियुक्तीमागे जी रक्कम मागत असे, ती ४० – ५० लाख रूपये असल्याचे या रिपोर्टमध्ये नमूद असल्याचे दिसत आहे. Police transfer posting racke; Rashmi Shukla reoprt vira; 29 police officers transfered??

महादेव इंगळेने कोणत्या अधिकाऱ्यांच्या बदल्या – नियुक्त्या कोणत्या ठिकाणी केल्या त्या ठिकाणांची नावेही अहवालात नमूद आहेत. बारामती, नगर, बीड, रायगड, सोलापूर, जत, मालेगाव या शहरांमध्ये सध्या पोस्टिंग असलेल्या अतिवरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची नावे या रिपोर्टमध्ये आहेत. तसेच मुंबईचे बदली करण्यात आलेले पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी पत्रात लिहिलेल्या अधिकाऱ्याचेही नाव रश्मी शुक्लांच्या व्हायरल झालेल्या कथित रिपोर्टमध्ये आहे. महादेव इंगळे या एजंटामार्फत २९ अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पोस्टिंग झाल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. तसेच महादेव इंगळेबाबत आणखी एक बाब नमूद आहे, ती म्हणजे तो १० ग्रँम सोन्याच्या अंगठीत पोवळे रत्न बसवून मागत होता. (Police transfer – posting racket)डीआयजी दर्जाच्या अधिकाऱ्यापासून पीआय दर्जाच्या अधिकाऱ्यापर्यंत सगळ्यांना महादेव इंगळेने मनपसंत पोस्टिंग मिळवून देण्याचे आश्वासन दिले आणि काही ठिकाणी ते पूर्ण केले. क्राइम, लाचलूचपत खात्यातल्या अधिकाऱ्यांच्या बदल्याही त्याच्याकरवी काहींनी करवून घेतल्या. पोलीस प्रशिक्षण केंद्रातून मालेगावला नियुक्ती, सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात नियुक्ती तसेच हिंगोली जिल्ह्यातील नागरी सेवेतील अधिकाऱ्याची बदली यांच्यासारख्या अनेक बदल्या आणि नियुक्त्या महादेव इंगळेने केल्याचे अहवालात नमूद आहे.

अर्थात महादेव इंगळे या एका एजंटाचे नाव व्हायरल झालेल्या अहवालातून पुढे आलेले आहे. असे आणखी अर्धा डझन एजंट असल्याचे तसेच ४० हून अधिकारी या बदली – पोस्टिंग रॅकेटमध्ये असल्याचे रश्मी शुक्ला यांच्या अहवालात नमूद आहे. त्याचे तपशील अजून बाहेर यायचे आहेत.

संदीप बिश्णोई, बिपीनकुमार सिंग, संजय वर्मा, विनय चौबे या वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्याचा दावा महादेव इंगळे करत होता. परंतु, या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या नाहीत, असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नबाब मलिक यांनी दुपारच्या पत्रकार परिषदेत वाचून दाखविले.

Police transfer posting racke; Rashmi Shukla reoprt vira; 29 police officers transfered??

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*