दिल्लीत ट्रॅक्टर मोर्चाचा मार्ग पोलिसांनी आखून दिला; विशिष्ट नियमांसह परवानगी


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : शेतकरी आंदोलकांचा कृषी कायद्यांविरोधातील ट्रॅक्टर मोर्चाचा निर्धार पाहून दिल्ली पोलिसांनी मोर्चाला परवानगी दिली आहे पण काही अटींसह आणि मोर्चाचा मार्ग आखून देऊनच.
प्रजासत्ताक दिनी राजपथावर भारतीय सैन्याची परेड आणि विविध राज्यांचे रथ पाहायला मिळणार आहेत. तर त्याचवेळी दिल्लीच्या सीमांवर आंदोलक शेतकरी ट्रॅक्टर मोर्चा काढून कृषी बिलांना विरोध करणार आहेत. Police traced the route of the tractor march in Delhi Permission with specific rules

सिंघू बॉर्डर, टिकरी बॉर्डर, गाजीपुर बॉर्डर व शहाजापूर बॉर्डर येथून ट्रॅक्टर्स दिल्लीमध्ये येणार आहेत. शेतकऱ्यांना आउटर रिंग रोडवर एकत्रित मोर्चा करायचा होता, मात्र त्याऐवजी दिल्लीतल्या अंतर्गत रस्त्यांवर मर्यादित प्रवेशाला परवानगी देण्यात आली आहे. सर्व सीमांवरचे ट्रॅक्टर एकत्रित येणार नाहीत तर जिथपर्यंत परवानगी दिली आहे तिथून ते आपापल्या ठिकाणी परत माघारी जाणार आहेत. पोलिसांनी तशा अटीवरच शेतकरी आंदोलकांच्या ट्रॅक्टर मोर्चाला परवानगी दिली आहे.प्रजासत्ताक दिनी होणारी ही ऐतिहासिक परेड असेल, असे शेतकरी नेत्यांनी सांगितले. देशाची आन-बान-शान यावर कोणताही फरक पडणार नाही. शेतकऱ्यांनी पोलिसांची बॅरिकेट्स तोडण्याचा इशारा दिला होता पण पोलिसांनीच ते काढण्यास स्वतः मान्य केले आहे. हा शेतकऱ्यांचा विजय आहे. दिल्ली पोलिसांना आणि केंद्र सरकारलाही एक पाऊल मागे जावे लागले आहे.

Police traced the route of the tractor march in Delhi Permission with specific rules

संपूर्ण जग दिल्लीतील शेतकरी परेड उद्या पाहणार आहे. या दरम्यान शांतता राखण्याचे आवाहन शेतकरी नेत्यांनी केलं आहे. ही अशी ऐतिहासिक शेतकरी परेड असेल जी याधी कधीच झाली नसेल, असे शेतकरी नेत्यांचे म्हणणे आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती