Election Commission on CM Mamata Banergee Nandigram Incident, says Its Totaly state governments Duty To protect Chief Minister

ममतादीदींवरील कथित हल्ल्याप्रकरणी दोषी पोलिसांना होऊ शकते शिक्षा, अधिकाऱ्याचे संकेत

विशेष प्रतिनिधी

नंदीग्राम – मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावरील कथित हल्ल्याप्रकरणी निवडणूक आयोग हे सुरक्षा व्यवस्थेत कुचराई करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यावर कारवाई करु शकते, असे संकेत आयोगातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिले आहेत. Police may be punished for alleged attack on Mamata Banerjeeममता बॅनर्जी यांनी घटनास्थळी पोलिस कर्मचारी आणि अधिकारी हजर नव्हते, असा आरोप केला आहे. यानुसार निवडणूक आयोगाला राज्य सरकारच्या अहवालाची प्रतिक्षा आहे. प्रचारादरम्यान ममता बॅनर्जी यांच्या वाहनाजवळ मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती, असे निवडणूक आयोगाच्या चित्रीकरणात दिसते.

बॅनर्जी यांच्या वाहनाजवळ लोकांची गर्दी पाहता ही सुरक्षा व्यवस्थेतील मोठी त्रुटी होती, असे अधिकाऱ्याचे म्हणणे आहे. व्हिडिओ फुटेजमधून घटनास्थळी नेमके काय घडले हे स्पष्ट होत नाही. बॅनर्जी यांना झेड सुरक्षा असून सुमारे वीस सुरक्षा रक्षक तैनातीत असतात.

दरम्यान, तृणमूल कॉंग्रेसचे नेते खासदार सौगत राय यांनी शुक्रवारी नवी दिल्लीत मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांची शिष्टमंडळासह भेट घेतली. त्यांनी ममता बॅनर्जी यांच्या हल्ल्याची उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली. ते म्हणाले, घटनास्थळी कोणताही पोलिस कर्मचारी हजर नव्हता. जीवे मारण्यासाठीच ममता यांच्यावर हल्ला झाला. यामागे कारस्थान असल्याचेही ते म्हणाले.

Police may be punished for alleged attack on Mamata Banerjee

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*