लस घेणाऱ्यांशी पंतप्रधान साधणार संवाद


पंतप्रधान नरेंद्र मोदी १६ जानेवारीला लसीकरण कार्यक्रमाचे उद्घाटन करणार आहे. या वेळी लस घेणाऱ्यांशी संवाद साधून त्यांचे आत्मबल वाढविणार आहेत.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी १६ जानेवारीला लसीकरण कार्यक्रमाचे उद्घाटन करणार आहे. या वेळी लस घेणाऱ्यांशी संवाद साधून त्यांचे आत्मबल वाढविणार आहेत.
PM to interact with vaccinators

पहिल्या दिवशी 2 हजार 934 केंद्रांवर 3 लाख आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाईल. आरोग्य मंत्रालयाने राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना सल्ला दिला आहे की, प्रत्येक व्हॅक्सीनेशन सेशनमध्ये लस घेणाऱ्यांची संख्या 100 पेक्षा जास्त नसावी. तसेच, 10 टक्के व्हॅक्सीन राखीव ठेवावी, कारण इतके डोस वेस्टेजमध्ये जाऊ शकतात. देशात ऑक्सफोर्ड-अँस्ट्राझेनकाची कोविशील्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनला मंजुरी देण्यात आली आहे. सरकारने मंगळवारी सांगितले की, लोकांना अद्याप आपल्या मर्जीची व्हॅक्सीन बाजारातून घेण्याचा पर्याय उपलब्ध नसेल. पहिल्या फेजमध्ये एक कोटी आरोग्य कर्मचारी आणि 2 कोटी फ्रंटलाइन वर्कर्सला मोफत लस दिली जाईल. यानंतर 50 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या आणि गंभीर आजार असलेल्या 50 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या लोकांना लस दिली जाईल. यानुसार, 27 कोटी लोकांना लस दिली जाईल.
सरकारने कोविशील्डचे 1.1 आणि कोव्हॅक्सिनचे 55 लाख डोस खरेदी केले आहेत. यांना गरजेनुसार, राज्य आणि केंद्रा शासित प्रदेशांमध्ये पाठवले जाईल. कोविशील्ड देशातील 60 मुख्य ठिकाणावर पोहोचला आहे, तेथून लहान-लहान सेंटरवर पाठवला जाईल. तर, कोव्हॅक्सिनची पहिली खेप 12 राज्यांमध्ये पाठवली आहे.  

PM to interact with vaccinators

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी