आत्मनिर्भर भारतातच जगाचे कल्याण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास

भारताला आत्मनिर्भर बनविण्यातच संपूर्ण जगाचे कल्याण आहे. या संकल्पनेतून संपत्ती आणि मानवी मूल्यांची निर्मिती होऊ शकते आणि ही मूल्य संपूर्ण मानव समाजाच्या हिताची ठरतील, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. PM Narendra Modi’s belief in the welfare of the world in a self-reliant India


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भारताला आत्मनिर्भर बनविण्यातच संपूर्ण जगाचे कल्याण आहे. या संकल्पनेतून संपत्ती आणि मानवी मूल्यांची निर्मिती होऊ शकते आणि ही मूल्य संपूर्ण मानव समाजाच्या हिताची ठरतील, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.

स्वामी चिद्भावनानंद यांच्या भगवद् गीतेच्या प्रदीप्त आवृत्तीचे प्रकाशन करताना आभासी माध्यमातून पंतप्रधान बोलत होते. ते म्हणाले की, 130 कोटी भारतीयांनी भारताला सर्वच क्षेत्रांमध्ये आत्मनिर्भर करण्याचा ठाम निर्धार केला आहे आणि यासाठी त्यांनी आपल्या जीवनशैलीतही आवश्यक ते बदल केले आहेत.दीर्घ काळाचा विचार केल्यास आत्मनिर्भर भारत हा केवळ आपल्या देशातील नागरिकांच्या फायद्याचा नाही, तर संपूर्ण जगाचेही त्यात हित आहे. संपूर्ण मानव समाजाचे कल्याण करण्याची क्षमता भारतात आहे. कोरोना महामारीच्या काळात जगाला औषधांची आवश्यकता होती. त्यावेळी भारतानेच ही गरज पुरवली आहे. आजही अनेक देशांना कोरोना लसीच्या मात्रा पाठविल्या जात आहेत. उपलब्ध औषधांचा वापर करून महामारीचा सामना करताना आपल्या वैज्ञानिकांनी दोन स्वदेशी लस विकसित केल्या. ही भारताची फार मोठी उपलब्धी आहे, असे ते म्हणाले.

मोदी म्हणाले की, ज्यावेळी भगवद् गीतेची रचना झाली होती, त्यावेळचा काळ युद्ध आणि संघर्षाचा होता. आगामी काळात यापेक्षाही मोठ्या संघर्षाचा सामना करावा लागेल, असे त्या काळात बोलले जात होते. आज संपूर्ण जग कोरोनाच्या भीषण महामारीचा सामना करीत आहे.

PM Narendra Modi’s belief in the welfare of the world in a self-reliant India

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*