तिरंग्याचा अवमान दुर्भाग्यपूर्ण घटना; पंतप्रधान मोदी यांचे दिल्लीतील हिंसाचारावर मत


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी तिरंग्याचा अवमान होण्याची घटना दुर्भाग्यपूर्ण होती, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील हिंसाचारावर मत व्यक्त केले. PM Narendra Modi nation was shocked to witness the insult of the Tricolour on January 26

नववर्षातील पहिल्या ‘ मन की बात ‘ कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी बोलत होते. दिल्लीतील हिंसक आंदोलनावर मोदी काय बोलतात, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. अर्थात मोदी यांनी या घटनेचा ओझरता उल्लेख केला.देशातील विविध घडामोडींचा आढावा घेताना मोदी म्हणाले, देशाने विविध क्षेत्रात भरीव प्रगती केली आहे.

मोदी यांच्या भाषणातील काही ठळक मुद्दे खालील प्रमाणे.

  1.  भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियात मिळविलेला विजय कौतुकास्पद होता. क्रिकेटपटूंचे श्रम आणि टीम वर्कमुळे हा विजय मिळाला.
  2.  कोरोनाची लस निर्मिती, लसीकरण मोहीम ही वैद्यकीय क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्याच्या दिशेने भारताची वाटचाल असल्याचे हे द्योतक आहे.
  3. भारताच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवानिमित स्वातंत्र्यवीरांच्या कार्यावर तरुणांनी लेखन करावे.
  4.  सॅनफ्रान्सिस्को ते बंगळूर विमान उड्डाणाचे नेतृत्व करणाऱ्या महिला वैमानिकांचा गौरव केला.
  5.  कोरोनाविरोधी लसीकरण देशात वेगात सुरु आहे. जगात हा वेग मोठा मानला जात आहे.
  6. केरळातील व्हेंबंनाड सरोवरात गेल्या कित्येक वर्षांपासून दिव्यांग असतानाही बोटीतून तलावातील प्लास्टिक बॉटल अन्य वस्तू बाहेर काढून स्वच्छता करणारे एनएस राजपन्न यांच्या कार्याचे कौतुक.
  7. हैदराबाद येथील भाजी मंडईतील टाकाऊ वस्तूपासून वीजनिर्मितीचा उपक्रम कौतुकास्पद आहे.

PM Narendra Modi nation was shocked to witness the insult of the Tricolour on January 26

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती