मोदी – ममता आज हल्दियामध्ये एकत्र; कार्यक्रम सरकारी, पण राजकीय मॅच रंगणार की ड्रॉ होणार??


विशेष प्रतिनिधी

कोलकाता : पंतप्रधान नरेंद्र मोदी आता आसामच्या असोम माला कार्यक्रमात आहेत. ते आसाम आणि पश्चिम बंगालच्या सरकारी दौऱ्यावर आणि विकास कामांच्या उद्घाटनासाठी आले आहेत… पण या दौऱ्याची चर्चा सर्वाधिक राजकीय होताना दिसते आहे.PM narendra modi – Mamata Banerjee togather on the dias in haldiya

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंती मुख्य कार्यक्रमात जशी राजकीय जुगलबंदी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि भाजप समर्थकांमध्ये झाली होती, तशीच जुगलबंदी हल्दियातील कार्यक्रमात रंगणार की राजकीय मॅच ड्रॉ राहणार अशी चर्चा सोशल मीडियात रंगली आहे.

त्यावेळी निमित्त नेताजींच्या कार्यक्रमात दीदी उभ्या राहिल्यावर जय श्रीरामच्या घोषणांचे होते. त्या घोषणांनी दीदी डिवचल्या गेल्या होत्या. आज हल्दियाच्या कार्यक्रमात दीदींना मुख्यमंत्री म्हणून निमंत्रण आहे. तेथे त्या प्रोटोकॉल म्हणून येतील की राज्याच्या प्रोटोकॉल मंत्र्याला पाठवून उपस्थित राहण्याची टाळतील, याकडे राजकीय निरीक्षक लक्ष ठेऊन आहेत.

यावेळी भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या बंगाल दौऱ्याचेही आहे. कालच त्यांनी राज्यातल्या २९४ विधानसभा मतदारसंघात जाणाऱ्या परिवर्तन यात्रेला हिरवा झेंडा दाखवून भाजपच्या आक्रमक प्रचाराची जमिनी स्तरावर सुरूवात करून दिली आहे. त्यामुळे हल्दियाच्या कार्यक्रमाला नवी राजकीय पार्श्वभूमी लाभली आहे. त्यावर दीदी कशा प्रकारे राजकीय प्रतिक्रिया व्यक्त करतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.मोदींच्या आसाम दौऱ्यात सोनीतपूर जिल्ह्यातील ढेकियाजुली येथे ‘असोम माला’ कार्यक्रम सुरू होतो आहे. राज्याच्या रस्ते – पायाभूत सुविधांना चालना देण्यात येते आहे. आसामच्या आर्थिक प्रगतीसाठी आणि कनेक्टिव्हिटी सुधारण्यास हातभार लावेल. विश्वनाथ आणि चराईदेव येथील वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांची पायाभरणी मोदींच्या हस्ते होत आहे. यामुळे आसामच्या आरोग्याच्या पायाभूत सुविधांना चालना मिळेल.

हल्दियात लोकसमर्पण

पश्चिम बंगालच्या हल्दियात बीपीसीएलने बांधलेले एलपीजी आयात टर्मिनल दुपारी ४.०० वाजता देशाला समर्पित केले जाईल. तसेच पंतप्रधान ऊर्जा गंगा प्रकल्पातील डोभी-दुर्गापूर नैसर्गिक गॅस पाइपलाइन विभागदेखील समर्पित केला जाणार आहे. या कार्यक्रमात मोदी आणि ममता दीदी एकत्र असणार आहेत.

पीएम मोदी म्हणाले की यानंतर हल्दिया रिफायनरीच्या दुसऱ्या उत्प्रेरक-आयसोडेक्सिंग युनिटची पायाभरणी केली जाईल. हल्दियाच्या रानीचक येथे एनएच 41 येथे चौपदरी असलेल्या आरओबी-कम उड्डाणपुलाचे उद्घाटनही होईल.

PM narendra modi – Mamata Banerjee togather on the dias in haldiya

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था