ममतादीदींच्या खेला होबेच्या बंगाली नाऱ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सर्वागिण विकासाचे उत्तर


विशेष प्रतिनिधी

पुरुलिया – दीदी म्हणतात खेला होबे, भाजप म्हणते नोकऱ्या; दीदी म्हणतात खेला होबे, भाजप म्हणते शिक्षण, पक्की घरे, प्रत्येक घरात पिण्याचे स्वच्छ पाणी, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्यावर टीकास्त्र सोडले. PM Narendra Modi lashesh on TMC leader Mamatadidi

तृणमूलवर आरोपांच्या फैरी झाडताना ते म्हणाले की, हे सरकार माओवादी बंडखोरांना पाठीशी घालते. अम्फन चक्रीवादळाच्यावेळी संथाल बांधवांना तृणमूलच्या भ्रष्टाचारामुळे केंद्राची मदत मिळू शकली नाही.दीदी जखमी झाल्या तेव्हा त्या बऱ्या होण्यासाठी मी प्रार्थना केली, पण त्या निराशेतून सारा राग माझ्यावर काढत आहेत. आमच्यासाठी मात्र त्या भारतातील करोडो मुलींसारख्याच आहेत. त्यांचा आदर करणे हा आमच्या संस्कृतीचा भाग आहे. माँ दुर्गेच्या आशीर्वादाने आम्ही तुमचा पराभव करू.

बंगालच्या प्रत्येक नागरिकाने आता मातृभूमीसाठी काहीतरी करण्याची वेळ आली आहे हे लक्षात ठेवावे. बंगाली जनतेने आधीच हा निर्धार केला आहे.

PM Narendra Modi lashesh on TMC leader Mamatadidi

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था