बंगाली शेतकऱ्यांना केंद्राच्या आधीच्या पैशासकट सगळे पैसे देणार, पंतप्रधानांचे हल्दियामध्ये आश्वासन; ममता – काँग्रेस – डाव्यांवर मॅचफिक्सिंगची टीका


विशेष प्रतिनिधी

हल्दिया : मा, माटी, मानुष असे खोटे आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या ममता दीदींनी बंगाली शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या पैशापासून आणि योजनांपासून वंचित ठेवले आहे. पण भाजपचे सरकार राज्यात आल्यानंतर बंगाली शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या पैशांसह सगळे पैसे दिले जातील. बंगाली जनतेसाठी पंतप्रधान जनआरोग्य योजना लागू केली जाईल, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हल्दियात दिले. त्याचवेळी मोदींनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी – काँग्रेस आणि डावे पक्ष यांच्यावर निवडणूकीसाठी मॅचफिक्सिंग केल्याचा आरोप केला.PM narendra modi assuares bengal farmers full money disbersment of PM kisan sanman nidhi

“असल पोरिबर्तन” आले की बंगालचा विकास होईल. त्रिपुरातील जनतेला याचा लाभ झाला. तसाच विकास योजनांचा लाभ बंगालमधील जनतेला मिळेल, असे मोदी यांनी सांगितले. हल्दियात आज पंतप्रधानांच्या हस्ते विविध विकास योजनांचे लोकर्पण झाले. त्या सरकारी कार्यक्रमाआधी त्यांनी भाजपने आयोजित केलेल्या जनसभेला संबोधित केले. मोदींनी केंद्र सरकारची कामगिरी जनतेपुढे मांडताना पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी सरकारच्या त्रूटी देखील सांगितल्या.तृणमूल काँग्रेस आणिममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधत पंतप्रधान मोदी म्हणाले, “पश्चिम बंगालची आज जी परिस्थिती आहे, त्याचे सर्वात मोठे कारण येथील राजकारण आहे. बंगालमध्ये विकासाचे राजकारण झालेच नाही. पहिले काँग्रेसने राज्य केले तर मोठ्याप्रमाणावर भ्रष्टाचार समोर आला. डाव्या पक्षांच्या शासनकाळात भ्रष्टाचार आणि अत्याचार वाढला आणि विकास ठप्प झाला.

त्यानंतर ममतांनी परिवर्तनाचे वचन देऊन मा, माटी, मानूषची भाषा वापरली. बंगाली जनतेने त्यांच्यावर विश्वास ठेवला. मात्र १० वर्षांच्या शासनकाळात त्यांनी परिवर्तन तर केले नाहीच उलट डाव्या पक्षांचे पुनरूज्जीवन केले आहे. यामध्ये पश्चिम बंगालमधली गरीबीचे प्रमाण वाढले, उद्योगधंदे बंद होत गेले. काही उद्योग राज्याबाहेर जाऊन त्या राज्यांचा विकास झाला. पश्चिम बंगाल जे स्वातंत्र्याच्या वेळी प्रगत राज्य होते, ते ७० वर्षांमध्ये मागास राज्य म्हणून ओळखले जाऊ लागले आहे.” ही परिस्थिती बदलण्यासाठी असल पोरिबर्तनाची गरज असल्याचे मोदींनी सांगितले.

PM narendra modi assuares bengal farmers full money disbersment of PM kisan sanman nidhi

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था