मोदींना “यूजलेस” म्हणत राहुलजींचे हिणकस ताशेरे; तामिळनाडू दौऱ्याची सुरूवातच खालच्या पायरीवरून!!

वृत्तसंस्था

थुथ्थुकुडी (तामिळनाडू) : केरळच्या समुद्रात डूंबायचा दौरा आटोपून राहुल गांधींनी तामिळनाडूच्या दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हिणकस ताशेरे मारून नव्या वादाला तोंड फोडलेय. राहुलजींनी पंतप्रधान हे गरीबांसाठी “यूजलेस” तर फक्त दोघांसाठी “यूजफुल” आहेत, असे संबोधून प्रचाराची सुरूवातच खालच्या पायरीवर नेऊन ठेवली. PM is extremely useful to two people who are using him to increase their wealth useless to the poor Rahul Gandhi

केरळचा दौऱा आटोपून राहुल गांधी आज तामिळनाडूत पोहोचले. त्यांनी थुथ्थीकुडीत व्हीओसी कॉलेजच्या विद्यार्थ्यांना संबोधित केले. मिठागारातील कामगार महिलांच्या मेळाव्यात भाषण केले. एक रोड शो केला आणि थुथ्थुकुडीमध्ये सेंट जॉन कॅथेड्रल नझारेथला भेट दिली.व्हीओसी कॉलेजमधील विद्यार्थी संवादातून राहुलजींच्या दौऱ्याची सुरूवात झाली. त्यांना प्रश्न विचारताना एका विद्यार्थ्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यूसलेस असल्याचा उल्लेख केला.

तर त्याला सुधारून मार्गी लावण्याऐवजी राहुलजींनी “यूजलेस – यूजफुल” या शब्दांवरच खेळ सुरू केला. राहुलजी म्हणाले, की इथे प्रश्न हा नाही, की पंतप्रधान यूजलेस आहेत की यूजफुल… कोणतीही वस्तू काहींसाठी यूजफुल काहींसाठी यूजलेस असते. पंतप्रधान गरीबांसाठी यूजलेस आहेत.

पण ते दोघांसाठी यूजफुल आहेत. ते दोघे (अदानी – अंबानी) आपली संपत्ती वाढविण्यासाठी पंतप्रधानांचा वापर करून घेताहेत… आणि आपल्या खिशातला रूमाल काढून तो खाली फेकण्याची अँक्शन करीत राहुलजी पुढे म्हणाले, माझे शब्द लक्षात ठेवा, एक दिवस असा येईल की ते दोघे पंतप्रधानांना असे फेकून देतील…

पण पंतप्रधान यूजफुल आहेत… हम दो… हमारे दो यांच्यासाठी… राहुलजींच्या या वक्तव्यावर सभागृहात विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजविल्या.

PM is extremely useful to two people who are using him to increase their wealth useless to the poor Rahul Gandhi

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*