बोरीस जॉन्सन यांनी घेतला पहिला डोस, आयर्लंड, फ्रान्समध्ये ॲस्ट्राझेनेकासाठी वयाचे बंधन;

विशेष प्रतिनिधी

लंडन – जगभरात कोरोनाचा पुन्हा फैलाव होत असताना फ्रान्सने ॲस्ट्राझेनेकाच्या लसीकरणावर निर्बंध आणले आहेत. आता ५५ पेक्षा अधिक वयोगटातील व्यक्तींना ॲस्ट्राझेनेकाची लस दिली जाणार आहे.  PM Boris Johnson takes jibs

रक्तात गाठी होत असल्याच्या अहवाल आल्यानंतर फ्रान्ससह युरोपातील अनेक देशांनी या लशीवर स्थगिती आणली होती. मात्र युरोपिय मेडिसीन संस्थेने काल ॲस्ट्राझेनेकाची लस सुरक्षित असल्याचे प्रमाणपत्र दिल्यानंतर फ्रान्सने लसीकरणाच्या नियमात बदल केले.ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी कोरोना प्रतिबंधक लशीचा पहिला डोस घेतला. त्यांनी सोशल मीडियावर म्हटले की, आपण ऑक्सफर्ड ॲस्ट्राझेनेकाचा पहिला डोस घेतला आहे.

शास्त्रज्ञ, एनएचएसचे कर्मचारी आणि स्वयंसेवकांचे आभार. लसीकरण मोहिमेत मदत करणाऱ्या सर्वांचे आभार. आपण ज्या गोष्टींपासून दुरावत आहोत, ते परत मिळवण्यासाठी लस घेणे महत्त्वाचे आहे. सर्वांनी लस घ्यावी, अशा शब्दात त्यांनी नागरिकांना आवाहन केले आहे.

आयर्लंडने ॲस्ट्राझेनेका लशीवरचे निर्बंध मागे घेण्याचे जाहीर केले. नेशन इम्यूनायजेशन ॲडव्हायजर कमिटीने म्हटले की, १८ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयोगटातील नागरिकांना ही लस दिली जाणार आहे. या लशीचे दुष्पपरिणाम समोर आल्यानंतर ॲस्ट्राझेनेकाचे लसीकरण तात्पुरत्या स्वरूपात स्थगित केले होते.

युरोपिय मेडिसीनच्या एजन्सीने लशीसंदर्भात तपासणी करून काल अहवाल सादर केला होता. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ही लस प्रभावी आणि सुरक्षित आहे. रक्तात गाठ होणे आणि लसीकरणाचा संबंध नाही, असा निर्वाळा दिला होता.3

PM Boris Johnson takes jibs

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*