पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय तरुणाईला आत्मनिर्भर अॅपचे चॅलेंज दिले आहे. पंतप्रधानांनी ट्विट करत तरुणांनी विविध गोष्टींसाठी उपयुक्त अॅप तयार करावेत, असे आवाहन तरुणांना केले आहे.
विशेष प्रतिनिधी
दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय तरुणाईला आत्मनिर्भर अॅपचे चॅलेंज दिले आहे. पंतप्रधानांनी ट्विट करत तरुणांनी विविध गोष्टींसाठी उपयुक्त अॅप तयार करावेत, असे आवाहन तरुणांना केले आहे.
कुरापतखोर चीनला धडा शिकविण्यासाठी केंद्र सरकारने ५९ चीनी अॅपवर बंदी घातली आहे. मात्र, ऐवढ्यावरच न थांबता आता चीनच्या या सगळ्या अॅपना पर्याय ठरू शकणारी अॅप बनविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. भारताला अॅप निर्मितीत स्वावलंबी बनवण्याची योजना तयार करणे सुरू केले आहे.
पंतपप्रधान नरेंद्र मोदी यांनी देश आता स्वावलंबी भारत अॅप इनोव्हेशन चॅलेन्ड लॉन्च करत असल्याचे म्हटले आहे. आज मेड इन इंडिया अॅप तयार करण्यासाठी तांत्रिक आणि स्टार्टअप समुदायामध्ये मोठा उत्साह आहे, असेही पंतप्रधान मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे. या मुळे इनोव्हेशन चॅलेंज सुरू करत आहेत असे मोदी यांनी म्हटले आहे.
जर तुमच्याकडे असे एखादे प्रोडक्ट असेल, किंवा तुम्हाला वाटत असेल की आपल्याकडे काही चांगले करण्याचा दृष्टीकोन आणि क्षमता आहे, तर मग तुम्ही टेक कम्युनिटीला नक्कीच जोडले जा, असे आवाहन त्यांनी केले आहे. चीनच्या अनेक अॅपवर बंदी भारताने बंदी घातली आहे. ही अॅप्स कमाईदेखील चांगली करत होते. या अॅपमध्ये अनेक तांत्रिक समस्या देखील होत्या. हे देखील ही अॅप बॅन करण्याचे एक कारण दिले जात आहे.
भारताच्या या निर्णयानंतर चीनला तिळपापड झाला. भारताने ज्या चीनी अॅपवर बंदी घातली आहे, त्यामध्ये टिकटॉक आणि यूसी ब्राउझर या भारतात अत्यंत लोकप्रिय अॅपचाही समावेश आहे