फायझरने दिली शेकडो बालकांना कोरोनाची लस, मात्र सुरक्षित लशीची अद्यापही जगाला प्रतिक्षा

विशेष प्रतिनिधी

लंडन : कोरोनाने जगभर उच्ढाद घातला असताना लसीकरणाने थोडा आशेचा किरण निर्माण केलेला आहे. मात्र, अद्यापही लहान मुलांसाठी सुरक्षित असणाऱ्या लशीची पालकांना प्रतिक्षा आहे.Pfizer vaccinated hundreds of children against coronavirus

मात्र फायझर कंपनीने तयार केलेली लस मात्र शेकडो मुलांना दिली असून त्याचे कोणतेही दुष्परिणाम दिसून आले नसल्याचे एका अहवालात म्हटले आहे.ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि ॲस्ट्राझेनेका कंपनीने पुन्हा एकदा एकत्र येत ६ ते १७ वयोगटातील मुलांवर लशीची चाचणी सुरु केली असली तरी, त्याची परिणामकारकता स्पष्ट झालेली नाही.

लहान वयातील बालकांना कोरोना संसर्गाचा धोका कमी असल्याचे काही अभ्यासांतून स्पष्ट झाले आहे. ‘आयसीएमआर’च्या एका अहवालानुसार, भारतातील एकूण बाधित लोकांपैकी केवळ १२ टक्के जण वीस वर्षांच्या आतील आहेत. बाकीचे सर्व जण विशीच्या वरचे आहेत.

लहान मुलांना लस देणे सुरक्षित आहे का, याबाबत विविध मतप्रवास असल्याचे दिसून आले आहे.इस्राईलमध्ये १२ ते १६ वयोगटातील ६०० बालकांना फायझर कंपनीने तयार केलेली लस देण्यात आली होती.

यातील कोणावरही दुष्परिणाम झाला नाही, असे एका अहवालात म्हटले आहे. ज्या बालकांना लस देण्यात आली त्यांना मधुमेह, लठ्ठपणा, फुफ्फुस आणि ह्रदयरोग किंवा कर्करोग असे गंभीर आजार होते.

Pfizer vaccinated hundreds of children against coronavirus

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*