वाहनचालकांसाठी आनंदाची बातमी पेट्रोल होणार 5 रुपयांनी स्वस्त

वृत्तसंस्था

नवी दिल्ली  : कोरोनाच्या संकटात पेट्रोल- डिझेलच्या उत्पादन शुल्कात 50 टक्के कपात करण्याचा विचार सुरू झाल्याने पेट्रोल प्रति लिटर 5 रुपयांनी स्वस्त होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. गेल्या काही महिन्यांपासून देशातील इंधन कंपन्यांनी इंधनाचे दर वाढविण्याचा सपाटा लावला होता. Petrol will be cheaper by Rs 5

त्यामुळे सर्वसामान्य वाहनचालक त्रस्त झाले होते. आता कंपन्यांनी इंधन दराचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे.

आता उत्पादन शुल्कात 50 टक्के कपात करण्याचा विचार सुरू झाल्याने लिटरमागे पेट्रोलचे दर 5 रुपयांनी कमी होणार आहेत.

Petrol will be cheaper by Rs 5

पेट्रोलियम मंत्रालयाने इंधन दारात दिलासा देण्याची शिफारस केली आहे. लॉकडाऊनमध्ये पेट्रोलवर एकरकमी 10 रुपये उत्पादन शुल्क वाढवले होते. परंतु उत्पादन शुल्क कपात कारण्यासाठी राज्यांनी सहकार्य करावे, असे मंत्रालयाने म्हंटले आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*