पेट्रोलवाढीवर इथेनॉलची मात्रा, नितीन गडकरी यांची माहिती; 60 रुपये प्रतिलिटर मिळणार


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : पेट्रोलऐवजी देशभरात इथेनॉल हे पर्यायी इंधन आणणार आहे. ते प्रति लिटर 60 रुपयाला खरेदी करता येईल, असे केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.Petrol hike ethenol Nitin gadkari 60 rupees

विरोधात असताना इंधन दारवाढीविरोधात तुमचा पक्ष आंदोलन करत होता, आता तुम्ही सत्तेवर आल्यावर इंधन वाढीबाबत बोलत नाही, असा प्रश्न पत्रकारांनी गडकरी यांना विचारला. तेव्हा ते बोलत होते.ते म्हणाले, विरोधात असताना आंदोलन करणे योग्य होते. आता सत्तेत असताना आंदोलन कसे करणार? त्या ऐवजी पेट्रोलला पर्याय शोधून काढण्याचे ठरविले आहे. त्यासाठी इथेनॉल हे पर्यायी इंधन बाजारात आणणार असून ते 60 रुपये प्रति लिटरने खरेदी करता येईल.

भंडारा, वर्धा आणि चंद्रपूर परिसरात इथेनॉलवर मोटारी आणि दुचाकी धावत आहेत. अशाच प्रकारे देशभरात ते उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत, असे त्यांनी सांगितले.

Petrol hike ethenol Nitin gadkari 60 rupees

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती