म्हणून पेट्रोल-डिझेल इतर देशांपेक्षा महाग, धमेंद्र प्रधान यांनी दिली माहिती

गोरगरीबांना केरोसीन कमी दरात मिळावे यासाठी त्याच्या किंमतीवर सरकार अनुदान देते. शेजारी देशांच्या तुलनेत भारतात केरोसीन स्वस्त आहे. त्यामुळेच पेट्रोल-डिझेल महाग असल्याची माहिती केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली आहे.petrol-diesel is more expensive than other countries said Dhamendra Pradhan


प्रतिनिधी

नवी दिल्ली : गोरगरीबांना केरोसीन कमी दरात मिळावे यासाठी त्याच्या किंमतीवर सरकार अनुदान देते. शेजारी देशांच्या तुलनेत भारतात केरोसीन स्वस्त आहे. त्यामुळेच पेट्रोल-डिझेल महाग असल्याची माहिती केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली आहे.

‘सीता मातेची धरती असलेल्या नेपाळमध्ये पेट्रोल डिझेल भारताहून स्वस्त आहे. रावणाच्या श्रीलंकेतही इंधनांची किंमत भारताहून कमी आहे. तर मग रामाच्या देशात सरकार पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत घट करणार का?’ असा प्रश्न समाजवादी पक्षाचे खासदार विश्वंभर प्रसाद निषाद यांनी राज्यसभेत विचारला होता.त्यावर उत्तर देताना प्रधान म्हणाले की, शेजारील देशांसोबत भारताची तुलना करणं चुकीचे आहे. कारण तिथं समाजातील काही लोक याचा वापर करतात. केरोसिनच्या किंमतीत भारत आणि या देशांमध्ये मोठा फरक दिसून येतो. बांग्लादेश नेपाळमध्ये केरोसिन जवळपास ५७-५९ रुपयांना मिळते. भारतात केरोसिनची किंमत ३२ रुपये प्रति लीटर आहे.

 

इंधनांची किंमत सर्वात वरच्या स्तरावर असल्याचं सांगणं ‘विसंगत’ असल्याचे सांगताना प्रधान म्हणाले की, आज आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत ६१ डॉलर आहे. आज आपल्याला कराचे मुद्दे अतिशय गंभीरतेने हाताळावे लागतात.

गेल्या ३०० दिवसांतील ६० दिवस असे आहेत, जेव्हा किंमतीत वाढ झालीय. पेट्रोलची किंमत सात दिवस घटवण्यात आली. तर डिझेलचे दरही २१ दिवस घटवण्यात आले. २५० दिवस असे होते जेव्हा किंमतीत कोणतेही बदल करण्यात आले नाहीत. पेट्रोल-डिझेलच्या किंमतीनी सर्वोच्च गाठल्याचं सांगणं विसंगत आहे, असं प्रधान यांनी म्हटलंय.

petrol-diesel is more expensive than other countries said Dhamendra Pradhan

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*