डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कायमस्वरूपी बंदी , ट्विटरचे स्पष्टीकरण ; अकाउंट बंदच राहील

वृत्तसंस्था

वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील बंदी हटवणार नसल्याचं ट्विटरने स्पष्ट केलं आहे. ते 2024 च्या निवडणुकीचे उमेदवार असले तरीही ट्विटरवरील बंदी कायम असेल, असे कंपनीचे मुख्य वित्त अधिकारी नेड सेगल यांनी सांगितले. Permanent ban on Donald Trump Twitter explanation

गेल्या वर्षी अमेरिकेच्या कॅपिटॉल हिलमध्ये हिंसाचार झाला. त्याला खतपाणी घतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम यांनी कायम बंदीची घातली.नेड सेगल म्हणाले की, एकदा प्लॅटफॉर्मवरुन एखाद्याला हटवलं की ते कायमच असते. आमची धोरणे लोकं हिंसा भडकवणार नाहीत, असे आहे. जर कोणी उल्लंघन केलं तर त्यांचं अकाउंट प्लॅटफॉर्मवरुन हटवावं लागेल. त्याला अपवाद ट्राम्पही नाहीत. धोरणनुसार ती व्यक्ती पुन्हा प्लॅटफॉर्मवर पुनरागमन करु शकत नाही.

दुसऱ्यांदा महाभियोग

अमेरिकेच्या 231 वर्षांच्या इतिहासात प्रथमच एखाद्या राष्ट्रपतींवर दोनदा महाभियोगाची सुनावणी होण्याची पहिलीच घटना आहे. ही सुनावणी मंगळवारी मध्यरात्रीपासून सुरू झाली. डोनाल्ड ट्रम्प यांनी समर्थकांना चिथावणी देत कॅपिटॉल हाउसमध्ये हिंसाचार करायला प्रेरित केले, असा आरोप त्यांच्यावर ठेवला आहे.

Permanent ban on Donald Trump Twitter explanation

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*