लोकांना भडकावितात आणि इटलीला पळून जातात, मनोज तिवारी यांची राहुल गांधींवर टीका

येथे लोकांना भडकावितात आणि स्वत: इटलीला पळून जातात, अशी टीका दिल्ली भाजपाचे माजी अध्यक्ष मनोज तिवारी यांनी राहुल गांधी यांच्यावर केली आहे. भोळ्या भाबड्या लोकांना समोर करून राजकारण करणारे नंतर बिळात जाऊन लपतात, असेही तिवारी यांनी म्हटले आहे. People provoke and flee to Italy, Manoj Tiwari criticizes Rahul Gandhi


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : येथे लोकांना भडकावितात आणि स्वत: इटलीला पळून जातात, अशी टीका दिल्ली भाजपाचे माजी अध्यक्ष मनोज तिवारी यांनी राहुल गांधी यांच्यावर केली आहे. भोळ्या भाबड्या लोकांना समोर करून राजकारण करणारे नंतर बिळात जाऊन लपतात असेही तिवारी यांनी म्हटले आहे. People provoke and flee to Italy, Manoj Tiwari criticizes Rahul Gandhi

तिवारी म्हणाले की, देशातील प्रत्येकाला आता समजून चुकले आहे की विरोधी पक्षाची नियत काय आहे. दरवेळी भोळ्या भाबड्या लोकांना पुढे करून यांचे राजकारण सुरू असते. दिल्ली हे या सगळ्या षडयंत्राचे केंद्र बनले आहे. दिल्लीतील सामान्य नागरिकांना समोर करून हे षडयंत्र सुरू आहे. सरकारने याची गंभीर दखल घेतली आहे. पण ही गोष्ट आता लोकांपर्यंत पोहोचविली पाहिजे. बुध्दीवंतांना, विचारी माणसांना सांगितली पाहिजे.तिवारी म्हणाले की, कृषि कायद्याला याच लोकांनी प्रथम मान्यता दिली. त्यानंतर लोकांना त्याच्याविरुध्द भडकावू लागले. सरकार शेतकऱ्यांशी संवाद साधत आहे. परंतु, त्यामध्येही अडथळे आणले जात आहेत. जगातील सगळ्या विरोधी शक्ती एकत्र येऊन हे षडयंत्र करीत आहेत का? अशीही शंका येऊ लागली आहे. लोकांना भडकाविण्याच्या वृत्तीने काय होते हे अमेरिकेत आपण पाहिले आहे. भारतापुढेही भविष्यात या प्रकारचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे आपणा सर्वांना जागृत होण्याची गरज आहे, असेही तिवारी म्हणाले.

People provoke and flee to Italy, Manoj Tiwari criticizes Rahul Gandhi

शाहिनबागमधील मुस्लिम बांधवांना मी विचारतो की नागरित्व संशोधन कायद्यामुळे कोणाच्या नागरिकत्वावर टाच आली का? कोणाचेही नागरिकत्व या कायद्याने गेले नाही. परंतु, या विरुध्द लोकांना भडकाविले गेले, असा आरोप तिवारी यांनी केला.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*