दारूबंदी उठविणाऱ्या ठाकरे सरकारवर चिमुरडीचा संताप, माझ्या बाबांना दारूडे करू नका


गांधी जयंतीच्या दिवशीच गडचिरोली, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यातून दारूबंदी उठविण्याचा घाट घालणाऱ्या ठाकरे सरकारवर एका चिमुरडीने संताप व्यक्त केला आहे. आपण सर्व राजमाता जिजाऊ माँसाहेब यांचे वंशज आहोत. महाराष्ट्रातली कुटुंबं उद्ध्वस्त करणाऱ्या दारुच्या करातून आम्ही आई जगदंबेची ओटी कशी काय भरणार? असा सवाल तिने केला आहे. pawar thackeray news


वृत्तसंस्था

चंद्रपूर : गांधी जयंतीच्या दिवशीच गडचिरोली, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यातून दारूबंदी उठविण्याचा घाट घालणाऱ्या ठाकरे सरकारवर एका चिमुरडीने संताप व्यक्त केला आहे. आपण सर्व राजमाता जिजाऊ माँसाहेब यांचे वंशज आहोत. महाराष्ट्रातली कुटुंबं उद्ध्वस्त करणाऱ्या दारुच्या करातून आम्ही आई जगदंबेची ओटी कशी काय भरणार? असा सवाल तिने केला आहे.pawar thackeray news

महाविकास आघाडी सरकारमधील काही नेत्यांनी दारूबंदीला विरोध करत ही बंदी उठावी, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. गडचिरोली, चंद्रपूर आणि वर्धा या तीन जिल्ह्यांमध्ये दारुमुक्तीच्या लढ्याला व्यापक रुप आलं आहे. येथील स्थानिक आदिवासी नागरिकांनी याविरोधात लढा पुकारला आहे. चंद्रपूरमधील एका आठवीच्या मुलीने दारुबंदीच्या मुद्द्यावर थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच पत्र लिहिले आहे.pawar thackeray news

यात तिने ‘माझे बाबा झिंगून घरात यावेत हे आदित्यदादांना रुचेल का?’ असा थेट सवाल मुख्यमंत्र्यांना विचारला आहे. तसेच या जिल्ह्यांमधील दारुबंदी न उठवता आहे ती दारुबंदीच्या निर्णयाची कठोर अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे.

मद्यपी वाहनचालकाने निरपराध जनतेला चिरडून जावे किंवा माझ्या तेजस दादाच्या गाडीला धडक मारावी या विचारानेही अंग शहारते. ‘माझे बांधव, माता भगिनी आनंदाने सुखाने नांदोत अशी मागणी आपणच आपले सर्वांचे दैवत पंढरीच्या विठोबांकडे करतो. मग दारुबंदी उठवावी हा आपल्या मंत्री महोदयांचा अनाठायी आग्रह का असावा?’ असा सवालही या आदिवासी मुलीने केला आहे.

pawar thackeray news

मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात आदिवासी विद्याथीर्नीने म्हटलं, 1963 मध्ये गडचिरोलीतील गावागावांमध्ये आदिवासी नागरिकांनी आपल्या परंपरेनुसार अनवाणी पायांनी मुंबईला जाऊन तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांची भेट घेतली होती. आम्ही मुलांच्या चुका झाल्यास बाबा कान पिरगाळतात. शासनाने कायदे करणे आणि स्वनियंत्रण करणे या दोन्ही गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत.

कितीही समाजप्रबोधन केले तरीही कित्येक मद्यपी वाट चुकतात. अशांना समुपदेशनासह प्रसंगी कायद्याने योग्य वाट दाखविणे हे आम्हा सर्वांचे कर्तव्यच आहे असे मी मानते, अशी साद या विद्यार्थीनीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घातली आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती