कॉंग्रेस नेत्यांच्या घमेंडी स्वभावामुळेच पक्षाची दारुण अवस्था, प्रणव मुखर्जी यांनी केली होती टीका


राजकीय अनुभव नसलेल्या वरिष्ठ कॉंग्रेस नेत्यांच्या घमेंडी स्वभावामुळेच पक्षाची दारुण अवस्था झाल्याचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आपल्या आत्मचरित्रात म्हटले आहे. कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे मुखर्जी यांनी थेट निर्देश केला आहे. party is in dire straits due to the arrogant nature of the Congress leaders


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : राजकीय अनुभव नसलेल्या वरिष्ठ कॉंग्रेस नेत्यांच्या घमेंडी स्वभावामुळेच पक्षाची दारुण अवस्था झाल्याचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आपल्या आत्मचरित्रात म्हटले आहे. कॉंग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे मुखर्जी यांनी थेट निर्देश केला आहे. party is in dire straits due to the arrogant nature of the Congress leaders

प्रणव मुखर्जी यांचे द प्रेसिडेन्शिअल इर्यस हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, कॉंग्रेसच्या पराभवाचे मुख्य कारण म्हणजे लोकांच्या आशा आणि आकांक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरली. याचे मुख्य कारण म्हणजे अनुभवाचा अभाव असलेले कॉंग्रेसचे नेतृत्व अत्यंत घमेंडी होते.


मोदी पंतप्रधान आहेत तोपर्यंत तुम्ही बिनधास्त फिरा, केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांचा राहुल गांधी यांना सल्ला


संयुक्त पुरोगामी लोकशाही आघाडी सरकारमध्ये अर्थ मंत्री असलेले मुखर्जी राष्ट्रपती झाले. मात्र, त्यांना हे पद नको होते असेही त्यांनी म्हटले आहे. सक्रीय राजकारणात असतो तर कॉंग्रेसची अवस्था इतकी वाईट झाली नसती असे त्यांनी म्हटले आहे. मुखर्जी म्हणतात, संयुक्त पुरोगामी लोकशाही आघाडी सरकारमध्ये मी अर्थमंत्री असतो तर पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना आघाडीतून बाहेर जाऊ दिले नसते. त्यांनी आघाडीतच राहावे यासाठी प्रयत्न केले असते. यावेळी कॉंग्रेसच्या नेतृत्वाने उदार दृष्टिकोन अवलंबायला हवा होता.

संकटाच्या काळात कॉंग्रेसच्या नेतृत्वाकडून आणखी चांगल्या निर्णयांची अपेक्षा होती. परंतु, तत्कालिन कॉंग्रेस नेतृत्वाने हे प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे पुढे ममता बॅनर्जी यांनी तृणमूल कॉंग्रेसची स्थापना केली. कॉंग्रेस पश्चिम बंगालमध्ये तिसऱ्या-चौथ्या क्रमांकावर फेकली गेली. आंध्र प्रदेशाचे विभाजन करून स्वतंत्र तेलंगणा राज्याची निर्मिती करण्यासही मुखर्जी यांचा विरोध होता. हे विभाजन झाल्यानंतर दोन्ही राज्यांतून कॉंग्रेस उखडली गेली.

party is in dire straits due to the arrogant nature of the Congress leaders

सोनिया गांधी यांच्या निर्णयांवर टीका करताना मुखर्जी यांनी म्हटले आहे की, त्यांनी एकतर्फी निर्णय घेतले. महाराष्ट्रातील कॉंग्रेस पक्षाची हाताळणी तर अत्यंत वाईट पध्दतीने केली. महाराष्ट्रात विलासराव देशमुख यांच्यासारख्या नेत्याचे निधन झाल्यावर सुशीलकुमार शिंदे किंवा शिवराज पाटील यांच्यासारख्या नेत्याला महाराष्ट्रात आणण्याची गरज होती. मात्र, कॉंग्रेसने हे केले नाही.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती