शिवाजी महाराजांचा राजाश्रय लाभलेली कळसूत्री बहुल्यांचीही कला जोपासली

विशेष प्रतिनिधी

मुंबई : शिवाजी महाराजांचा राजाश्रय लाभलेली कळसूत्री बहुल्यांचीही कला काळाच्या ओघात नाहिसी झाली होती. ती जतन करण्याचे काम परशुराम गंगावणे यांनी केले आहे. Parshuram Atmaram Gangavane shivaji maharaj doll art

छत्रपती शिवाजी महाराजांनी कठपुतळी, कळसूत्री, पपेटचे सादरीकरण करण्यासाठी काही ठरावीक मंदिरात जागा दिली आणि ठाकर आदिवासी यांच्या रोजी-रोटीचा प्रश्नही सोडविला.ठाकर आदिवासी कला आंगण हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाहिले आदिवासी लोककला संग्रहालय आहे. ते त्यांनी गोठ्यामध्ये सुरु केले. या संग्रहालयात सिंधुदुर्गचा ठाकर आदिवासी समाजाचा पारंपरिक लोककला कळसूत्री बाहुल्या, चित्रकथी, चामड्याच्या बाहुल्या, पांगुळ बेल, डोना वाद्य, गोंधळ, पोथराज अशा लोककलेचं मांडणी केली आहे.

गंगावणे यांनी विश्राम ठाकर आदिवासी कला आंगण या चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून बेटी बचाओ बेटी पढाओ, व्यसनमुक्ती , स्वच्छ भारत अभियान, एड्स अवेरनेस अशा अनेक विषयावर कळसुत्री बाहुल्यांच्या माध्यमातून कार्यक्रम केले आहेत.

Parshuram Atmaram Gangavane shivaji maharaj doll art

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*