विशेष प्रतिनिधी
मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील पिंगुळी गावचे रहिवासी परशुराम आत्माराम गंगावणे यांना कला क्षेत्रात योगदान दिल्याबद्दल विशेषतः कळसूत्री बाहुल्याची कला जतन केल्याबाद्दल नुकताच पद्मश्री सन्मान दिला. त्याच्या कार्याचा आढावा..Parashuram Gangavane telling stories through Kalsutri dolls
कळसूत्री बाहुल्याच्या माध्यमातून कथा सांगण्याची कला ही महाराष्ट्राच्या रक्तात पूर्वीपासून आहे. गंगावणे कुटुंब 400 पेक्षा जास्त वर्षांपासून चामड्याच्या कळसूत्री बाहुल्या बनवतात आणि त्या माध्यमातून कथा सांगत आले आहेत.
या मंडळींकडे लिखित प्राचीन दस्तावेज नाही. मात्र पिढ्यानपिढ्या सांगत आलेल्या कथांमुळे या समाजातील प्रत्येकांच्या ओठावर ठाकरी शैलीतील रामायण, महाभारत ऐकायला मिळते.त्यांचे पूर्वज दिवसा छत्रपती शिवाजी महाराजांसाठी हेरगिरी करीत असत आणि रात्री कथा सांगत असत.
परशुराम आत्माराम गंगावणे यांनीच कळसूत्री बाहुल्याची ही कला जपली आहे.कळसूत्री बाहुल्या आणि ठाकरी लोकगीतांच्या माध्यमातून ते रामायण आणि महाभारताच्या कथा सांगतात.
संगीतासाठी, ठाकर समाज फक्त तीन वाद्ये वापरतात. त्यात वीणा, टाळ आणि हुडुक यांचा समावेश असतो. हुडुक म्हणजे दोन डोक्यांचा एक लहान ड्रम असून तो जो बोटांनी वाजविला जातो. गंगावणे यांनी महाराष्ट्राची कला जपण्यासाठी कठोर परिश्रम घेतले.