Parambir Singh Plea In SC: Parambir Singh Plea in Supreme Court, Demands CBI Probe for Alligaitions On HM Anil Deshmukh

Parambir Singh Plea In SC : परमबीर सिंगांची सुप्रीम कोर्टात धाव, गृहमंत्री अनिल देशमुखांच्या CBI चौकशीची मागणी

Parambir Singh Plea In SC : महाराष्ट्राच्या राजकारणात एकमागोमाग एक धक्कादायक घटना घडत आहेत. गृहमंत्री अनिल देशमुखांच्या राजीनाम्याच्या मागणीवर विरोधी पक्ष ठाम आहेत. दुसरीकडे, आता मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी सोमवारी सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे. परमबीर सिंग यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात गृहमंत्र्यांवर केलेल्या आरोपांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात एकमागोमाग एक धक्कादायक घटना घडत आहेत. गृहमंत्री अनिल देशमुखांच्या राजीनाम्याच्या मागणीवर विरोधी पक्ष ठाम आहेत. दुसरीकडे, आता मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी सोमवारी सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे. परमबीर सिंग यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात गृहमंत्र्यांवर केलेल्या आरोपांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी आपल्या होमगार्ड विभागात झालेल्या बदलीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत सीबीआयने सर्व आरोपांच्या चौकशीची मागणी करण्याबरोबरच अनिल देशमुख यांच्या घराबाहेरील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घ्यावे, जेणेकरून सर्वांसमोर सत्य येईल, असेही त्यांनी म्हटले आहे.

असे आहे संपूर्ण प्रकरण

25 फेब्रुवारीला देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईस्थित अँटिलिया या घराच्या बाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ सापडली होती. सुरुवातीला हे दहशतवाद्यांशी संबंधित कृत्य असल्याचे म्हटले जात होते. परंतु लवकरच राष्ट्रीय तपास संस्थेने हे प्रकरण ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आणि संशयाची सुई एपीआय सचिन वाझे यांच्यावर फिरली. यानंतर स्कॉर्पिओ मालक मनसुख हिरेन यांची हत्याही झाली. प्रकरण अंगावर शेकत असल्याचे पाहून महाविकास आघाडी सरकारने तातडीने परमबीर सिंग यांची मुंबई पोलीस आयुक्त पदावरून उचलबांगडी केली. यानंतर याच परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कथित भ्रष्टाचाराची पोलखोल एका पत्राद्वारे केली आहे. या पत्र प्रकरणामुळे अवघ्या देशात खळबळ उडाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*