मुंबईतल्या १७५० बार, हुक्का पार्लर्समधून ४० – ५० कोटी रूपये, अन्य सोर्समधून उर्वरित रक्कम गोळा करण्याचे अनिल देशमुखांचे टार्गेट; सचिन वाझे – एसीपी संजय पाटील डीसीपी भुजबळ, गृहमंत्र्यांची सचिव पलांडे यांची नावे!!

विशेष प्रतिनिधी

मुंबई – मुंबईतल्या १७५० बारमधून ४० – ५० कोटी आणि अन्य सोर्समधून ४० – ५० कोटी अशी सुमारे १०० कोटी रूपयांची रक्कम गोळा करण्याचे टार्गेट सचिन वाझेला गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले असल्याचा खळबळजनक आरोप मुंबईचे बदली झालेले पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी आज करून महाराष्ट्रातले ठाकरे – पवार सरकार हादरवून टाकले.Parambir singh letter; takes names of anil deshmukh, ACP sanjay patil, DCP bhujbal, palande

मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांना लिहिलेल्या तब्बल आठ पानी पत्रात या पैसे गोळा करण्याच्या टार्गेटचे तपशीलच परमबीर सिंग यांनी दिले आहेत. परमबीर सिंग यांच्यासारख्या अतिवरिष्ठ अधिकाऱ्याने थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून खुद्द त्यांना, ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांना घेरून टाकले आहे. कारण या सगळ्याची माहिती तुम्हाला वर्षा बंगल्यावर दिली होती, असे परमबीर सिंग यांनी पत्रात नमूद केले आहे.



परमबीर सिंग पत्रात म्हणतात, की गृहमंत्री अनिल देशमुखांनी सचिन वाझे यांना गेल्या काही महिन्यांमध्ये वारंवार आपले अधिकृत निवासस्थान ज्ञानेश्वरी येथे बोलविले. फेब्रुवारीच्या मध्यात त्यांनी सचिन वाझेंना पैसे गोळा करण्यास मदत करण्यास सांगितले.

१०० कोटी रूपये गोळा करण्याचे टार्गेट आहे. मुंबईतले १७५० बार, रेस्टॉरंट आणि अन्य येथून ४० – ५० कोटी रूपये गोळा करता येतील. त्या प्रत्येकाकडून महिन्याला २ – ३ लाख रूपये गोळा केले तरी ४० – ५० कोटी रूपये जमतील. तर उरलेली रक्कम अन्य सोर्समधून गोळा करता येईल, असे पत्रात नमूद केलेल्या ७ व्या मुद्द्यात म्हटले आहे.

सचिन वाझे काही दिवसांनी माझ्या ऑफिसमध्ये आले आणि मला ही माहिती दिली. मला त्याचा धक्का बसला. काही दिवसांनी एसीपी संजय पाटील यांना मुंबईतल्या हुक्का पार्लरविषयी चर्चा करण्यासाठी गृहमंत्र्यांनी आपल्या अधिकृत निवासस्थानी बोलावले. त्यावेळी गृहमंत्र्यांचे सचिव पलांडे आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.

त्यानंतर दोन दिवसांनी पुन्हा एसीपी पाटील आणि डीसीपी भुजबळ यांना गृहमंत्र्यांनी परत निवासस्थानी बोलावले. काही वेळ त्यांना बाहेरच्या हॉलमध्ये वाट पाहण्यास सांगण्यात आले. गृहमंत्र्यांचे सचिव पलांडे गृहमंत्र्यांच्या चेंबरमध्ये गेले. काही वेळाने बाहेर येऊन पलांडेंनी एसीपी पाटलांना सांगितले, की गृहमंत्र्यांनी ४० – ५० कोटी जमविण्याचे टार्गेट ठरविले आहे. १७५० बार – रेस्टॉरंटमधून गोळा करणे शक्य आहे. एसीपी पाटलांनी मला गृहमंत्र्यांनी पैसे गोळा करण्यास सांगितल्याची माहिती दिली, असेही परमबीर सिंग यांनी पत्रात नमूद केले आहे.

Parambir singh letter; takes names of anil deshmukh, ACP sanjay patil, DCP bhujbal, palande

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*