Parambir singh Letter: Raj Thackeray Demands HM Anil Deshmukhs immidiate high level inquiry

Parambir singh Letter : राज ठाकरे कडाडले, महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळिमा, अनिल देशमुखांची ताबडतोब उच्चस्तरीय चौकशी करा

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पत्रामुळे अवघ्या देशात खळबळ उडाली आहे. या पत्रात त्यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुखांवर हप्ता वसुलीचे गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणावर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. Parambir singh Letter: Raj Thackeray Demands HM Anil Deshmukhs immidiate high level inquiry


विशेष प्रतिनिधी

मुंबई : माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पत्रामुळे अवघ्या देशात खळबळ उडाली आहे. या पत्रात त्यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुखांवर हप्ता वसुलीचे गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणावर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राज ठाकरे म्हणाले की, ही घटना महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळिमा फासणारी आहे, यामुळे गृहमंत्री अनिल देशमुख यांची तातडीने उच्चस्तरीय चौकशी केली जावी. अनिल देशमुखांनी राजीनामा देण्याचीही मागणी त्यांनी केली आहे. परमबीर सिंग यांच्या पत्रानंतर आता भाजप नेत्यांनीही अब तो स्पष्ट है ये सरकार भ्रष्ट है असे म्हणत आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपनेही अनिल देशमुखांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली आहे.परमबीर सिंग यांनी लिहिलेल्या पत्रात अनिल देशमुखांवर 100 कोटींचे हप्ते गोळा करण्याचा गंभीर आरोप केला आहे. परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हे पत्र लिहिलं आहे. त्या पत्रात सिंग यांनी काही पुरावेही जोडले आहेत. त्यात त्यांनी चॅटचाही समावेश आहे. हा चॅट म्हणजेच सर्वात मोठा पुरावा असून मुख्यमंत्र्यांना अजून कोणता पुरावा हवाय? असा सवाल फडणवीसांनी केलाय. हे प्रकरण अत्यंत गंभीर असून राज्यात जी प्रकरणं उघडकीस येत आहेत त्यामुळे महाराष्ट्र पोलिसांचे खच्चीकरण सुरू झाल्याचं ते म्हणाले. हे अत्यंत वाईट असल्याचंही फडणवीसांनी म्हटले आहे.

या पत्रानंतर गृहमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा. त्यांनी राजीनामा द्यावा किंवा मुख्यमंत्र्यांनी त्यांना पदावरून हटवावं, अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे. या प्रकरणाचा तपास एनआयएकडून व्हायला हवा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. महाराष्ट्राला मान खाली घालायला लावणारा हा प्रकार असून महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करणारा हा विषय आहे. हा एखाद्या राजकीय किंवा सामाजिक क्षेत्रातील व्यक्तीने केलेला आरोप नाही, यामुळे गृहमंत्र्यांवर ताबडतोब कठोर कारवाई व्हायला हवी, अशी आक्रमक भूमिका फडणवीसांनी घेतली आहे.

Parambir singh Letter: Raj Thackeray Demands HM Anil Deshmukhs immidiate high level inquiry

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*