Parambir Singh letter provides ransom and currption agenda of Home Minister Anil Deshmukh, read chat details given by Parambir Singh

Parambir Singh letter : गृहमंत्र्यांच्या अनिल देशमुखांच्या हप्ते वसुली आदेशाचा ‘हा’ आहे पुरावा, वाचा परमबीर सिंहांनी दिले चॅटिंगचे डिटेल्स

सचिन वाझे प्रकरणामुळे मुंबई पोलीस आयुक्तपदावरून उचलबांगडी करण्यात आलेले पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. गृहमंत्र्यांनी दर महिन्याला 100 कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट सचिन वाझेला दिल्याचा खळबळजनक आरोप परमबीर सिंग यांनी केला आहे. परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत पत्र लिहिलं आहे. हे पत्र येताच संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : सचिन वाझे प्रकरणामुळे मुंबई पोलीस आयुक्तपदावरून उचलबांगडी करण्यात आलेले पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. गृहमंत्र्यांनी दर महिन्याला 100 कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट सचिन वाझेला दिल्याचा खळबळजनक आरोप परमबीर सिंग यांनी केला आहे. परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत पत्र लिहिलं आहे. हे पत्र येताच संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे.

आपल्या पत्रात परमबीर सिंग यांनी एसीपी पाटील या पोलीस अधिकाऱ्यासोबत झालेल्या चॅटिंगची डिटेल्स आपल्या पत्रात समाविष्ट केली आहे. परमबीर सिंग यांनी तारीख आणि वेळेसहित ही चॅटिंग दिल्याने गृहमंत्र्यांविरुद्ध भ्रष्टाचाराचा हा मोठा पुरावा असल्याचे सिद्ध होते.

परमबीर सिंगांची एसीपी पाटील यांच्याशी झालेली चॅटिंग जशीच्या तशी येथे देत आहोत…

मी (परमबीर सिंग) : पाटील, गृहमंत्री व पलांडेंनी किती बार व रेस्तराँचे व किती रुपयांचे टार्गेट दिल्याचे सांगितले?

मी : अर्जंट प्लीज?

ACP पाटील : एकूण 1750 बार व रेस्तराँ. प्रत्येकी 3 लाख रुपये. एकूण कलेक्शन अंदाजे 50 कोटी रुपये. पलांडेनी माझ्यासोबत भुजबळ होते तेव्हा ही अपेक्षा व्यक्त केली.

मी : तुम्ही पलांडेंना कधी भेटलात?

ACP पाटील : आम्ही 4 मार्चला भेटलो.

मी : तुम्ही गृहमंत्र्यांना कधी भेटलात?

ACP पाटील : पलांडेंना भेटलो त्याच्या 4 दिवस आधी. हुक्का पार्लरसंबंधी बैठक झाली.

मी : वाझे व गृहमंत्र्यांची भेट कधी झाली?

ACP पाटील : वाझे-गृहमंत्र्यांच्या भेट कधी झाली ते आता आठवत नाही.

मी : तुम्ही म्हणाला होता की, काही दिवसांपूर्वीच भेट झाली होती.

ACP पाटील : हो सर. बहुधा फेब्रुवारीच्या अखेरीस.

मी : पाटील मला आणखी काही माहिती हवीय. गृहमंत्र्यांना भेटून आल्यानंतर वाझे तुम्हाला भेटला होता का?

ACP पाटील : हो सर. वाझे मला भेटला होता.

मी : गृहमंत्र्यांनी काय सांगितले आहे ते वाझेंनी तुम्हाला सांगितले का?

ACP पाटील : गृहमंत्र्यांनी 1750 बार-रेस्तराँकडून प्रत्येकी 3 लाख रुपये असे एकूण 40 ते 50 कोटींच्या वसुलीचे टारगेट दिलेय, असे वाझेने सांगितले.

मी : अच्छा.. म्हणजे वाझेने मला सांगितले तेच तुम्हालाही सांगितलेय.

ACP पाटील : 4 मार्चला पलांडे यांनी मलासुद्धा वाझेला हेच टार्गेट दिलेय ते सांगितले.

हेही जरूर वाचा…

Parambir Singh letter provides ransom and currption agenda of Home Minister Anil Deshmukh, read chat details given by Parambir Singh
 
Parambir Singh letter provides ransom and currption agenda of Home Minister Anil Deshmukh, read chat details given by Parambir Singh
 
Parambir Singh letter provides ransom and currption agenda of Home Minister Anil Deshmukh, read chat details given by Parambir Singh
 

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*