Parambir singh letter Bomb Home Minister's intervention in Mohan Delkar case too

Parambir singh letter Bomb : मोहन डेलकर प्रकरणातही गृहमंत्र्यांचा हस्तक्षेप, कायद्याच्या दृष्टीने योग्य नसतानाही मुंबईत दाखल करायचा होता गुन्हा

(Parambir singh letter Bomb) परमबीर सिंग यांनी भाजप खासदार मोहन डेलकर यांच्या मुंबई झालेल्या आत्महत्याप्रकरणातही महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी हस्तक्षेप केल्याचा आरोप केला आहे. गृहमंत्री अनिल देशमुखांना डेलकर यांच्या प्रकरणात मुंबईत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून हवा होता. याबाबत त्यांनी परमबीर सिंग यांना तसे निर्देश दिले होते. Parambir singh letter Bomb Home Minister’s intervention in Mohan Delkar case too


विशेष प्रतिनिधी

मुंबई : परमबीर सिंग यांनी आपल्या पत्रात (Parambir singh letter Bomb) भाजप खासदार मोहन डेलकर यांच्या मुंबई झालेल्या आत्महत्याप्रकरणातही महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी हस्तक्षेप केल्याचा आरोप केला आहे. गृहमंत्री अनिल देशमुखांना डेलकर यांच्या प्रकरणात मुंबईत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून हवा होता. याबाबत त्यांनी परमबीर सिंग यांना तसे म्हटलेही होते. भाजप खासदार मोहन डेलकर यांचा 22 फेब्रुवारी रोजी मुंबईतील सी ग्रीन हॉटेलमध्ये मृतदेह आढळला होता. याबाबत मरीन ड्राइव्ह पोलिसांनी आत्महत्येची नोंद केली होती. तेथे तपासादरम्यान सुसाइड नोटही आढळली होती. या सुसाईड नोटमध्ये दादरा आणि नगर हवेलीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर आरोप तसेच त्यांच्याद्वारे झालेल्या छळाबद्दल लिहिलेले होते. यामुळे डेलकर यांनी आत्महत्या करत असल्याचे लिहून ठेवले आहे. याबाबत मरीन ड्राइव्ह पोलिसांचा तपास सुरू होता.

Parambir singh letter Bomb Home Minister's intervention in Mohan Delkar case too

मोहन डेलकर प्रकरणात गृहमंत्र्यांचा हस्तक्षेप

परमबीर सिंग आपल्या पत्रात सांगतात की, एका दिवशी गृहमंत्र्यांनी याप्रकरणी मुंबईत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून घेण्याची इच्छा प्रकट केली. माझ्या दृष्टिकोनातून याबाबत कायदेशीर सल्ला घेतल्यानंतर असे आढळले की, आत्महत्या ही मुंबईत झाली, परंतु आत्महत्येस प्रवृत्त केल्याची कारणे आणि व्यक्ती ही दादरा आणि नगर हवेलीत आहेत, त्यामुळे आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा जर नोंदवायचाच असेल तर तो दादरा आणि नगर हवेलीमध्ये झाला पाहिजे. कारण ही बाब त्यांच्या कायदेक्षेत्रात येते. यामुळे याला विरोध केला. माझ्या विरोधामुळे गृहमंत्री अनिल देशमुख नाराज होते, आणि यावर सारखी मला विचारणा करत होते. मुंबईत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून त्यांना त्यांची राजकीय पोळी भाजायची होती, परंतु असे होऊ शकले नाही.गृहमंत्री नेहमीच पोलीस अधिकाऱ्यांना आपल्या बंगल्यावर बोलवायचे

परमबीर सिंग पुढे लिहितात की, एवढे झाल्यानंतरही आणि कायदेतज्ज्ञांचे मत जाणूनही गृहमंत्र्यांनी यावर महाराष्ट्राच्या विधानसभेत दि. 9 मार्च 2021 रोजी मोहन डेलकर यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवण्याची तसेच एक एसआयटी स्थापन करण्याची घोषणा केली. मुंबईचा पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत असताना माझ्या मागील एक वर्षाहून अधिक काळातील अनुभवानुसार मला गृहमंत्री अनिल देशमुखांनी अनेक पोलीस अधिकाऱ्यांना आपल्या सरकारी निवासस्थानी बोलावल्याचे आढळले आहे. तेथे बोलावून त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना थेट सूचना देऊन एखाद्या प्रकरणात विशिष्ट भूमिका घेण्याचे निर्देश दिल्याचे मला आढळले आहे. पोलिसांच्या तपासात हा राजकीय हस्तक्षेप अनैतिक असून असंवैधानिकही आहे. अशा प्रकरणांवर गत काळात सुप्रीम कोर्टानेही कडक शब्दांत ताशेरे ओढलेले दिसून येतात. अशा हस्तक्षेपांना माझा विरोध पाहून गृहमंत्री अनिल देशमुख नाखुश होते.

मला बळीचा बकरा बनवले

पुढे परमबीर सिंगांनी असेही लिहिले की, मी माझ्या पोलीस दलाची संपूर्ण जबाबदारी घेतो. परंतु या हस्तक्षेपांमुळे हे स्पष्ट होते की, गैरकृत्यांची जबाबदारी अशा व्यक्तींवर आहे ज्यांनी गैरकृत्य केले. वरील सर्व बाबी पाहता ज्या मी वर नमूद केल्या आहेत, त्यावरून हे स्पष्ट होते की, खरे गैरकृत्य करणाऱ्यांपासून लक्ष वळवण्यासाठी मला बळीचा बकरा बनवण्यात आले आहे. मी कोणत्याही गैरकृत्यात सहभागी असल्याचा कोणताही पुरावा, कुणाही व्यक्तीने सादर केलेला नाही. फक्त काही निव्वळ अफवांचा अपवाद आहे. सचिन वाझे यांचे फोन रेकॉर्ड आणि कॉल डाटा तपासला जावा, ज्यावरून माझ्याविरुद्धच्या आरोपांचे खंडन होऊन सत्य समोर येईल. यामुळे प्राप्त परिस्थितीत गृहमंत्र्यांनी माझी केलेली बदली ही प्रशासनिक किंवा नैमित्तिक नसल्याचे दिसून येते. मी केलेल्या तपासात गंभीर चुका केल्या आणि त्या अक्षम्य आहेत, हे प्रत्यक्ष नोंदींच्या विरुद्ध आहे. उलट ही बदली प्रतिशोधाच्या कारणानेच झाल्याचे दिसून येते, असा आरोपही परमबीर सिंग यांनी आपल्या पत्रात केला आहे.

Parambir singh letter Bomb Home Minister's intervention in Mohan Delkar case too
 

Parambir singh letter Bomb Home Minister's intervention in Mohan Delkar case too

Parambir singh letter Bomb Home Minister’s intervention in Mohan Delkar case too

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*