Parambir Singh Letter: Anil Deshmukh's conviction against corruption is inevitable! May give Resignation for these reasons

Parambir Singh Letter : भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या अनिल देशमुखांची गच्छंती अटळ! ‘या’ कारणांमुळे द्यावा लागू शकतो राजीनामा

सचिन वाझे प्रकरणामुळे मुंबई पोलीस आयुक्त पदावरून परमबीर सिंग यांची उचलबांगडी करण्यात आली होती. त्यांनीच आता मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून अनिल देशमुखांच्या भ्रष्टाचाराची तक्रार करत खळबळ उडवून दिली आहे. खऱ्या गुन्हेगारांपासून लक्ष वळवण्यासाठी माझ्यावर खोटे आरोप करून बळीचा बकरा बनवण्यात आल्याचे त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. विशेष म्हणजे अनिल देशमुखांवर करण्यात आलेले आरोप हे एखाद्या राजकीय नेत्याने अथवा सामाजिक संस्थेने केलेले नसून एका जबाबदार पोलीस अधिकाऱ्याने केले आहेत. यामुळे महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का बसला असून आता लवकरच देशमुखांना राजीनामा द्यावा लागू शकतो, अशा चर्चांना ऊत आला आहे. Parambir Singh Letter: Anil Deshmukh’s conviction against corruption is inevitable! May give Resignation for these reasons


विशेष प्रतिनिधी

मुंबई : सचिन वाझे प्रकरणामुळे मुंबई पोलीस आयुक्त पदावरून परमबीर सिंग यांची उचलबांगडी करण्यात आली होती. त्यांनीच आता मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून अनिल देशमुखांच्या भ्रष्टाचाराची तक्रार करत खळबळ उडवून दिली आहे. खऱ्या गुन्हेगारांपासून लक्ष वळवण्यासाठी माझ्यावर खोटे आरोप करून बळीचा बकरा बनवण्यात आल्याचे त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

विशेष म्हणजे अनिल देशमुखांवर करण्यात आलेले आरोप हे एखाद्या राजकीय नेत्याने अथवा सामाजिक संस्थेने केलेले नसून एका जबाबदार पोलीस अधिकाऱ्याने केले आहेत. यामुळे महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का बसला असून आता लवकरच देशमुखांना राजीनामा द्यावा लागू शकतो, अशा चर्चांना ऊत आला आहे.

पत्रामुळे गृहखात्याची बदनामी

आधीच मनसुख हिरेन आणि अँटिलिया स्फोटके प्रकरणामुळे ठाकरे सरकार बॅकफूटवर गेले होते. या प्रकरणांचे तपास अधिकारी सचिन वाझेच त्यात आरोपी असल्याचे राष्ट्रीय तपास संस्थेने म्हटले आहे. या प्रकरणापासून जनतेचे लक्ष वळवण्यासाठीच परमबीर सिंगांची बदली करण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. तसा आरोपही परमबीर सिंग यांनी आपल्या पत्रात केला आहे.

एकूणच या पत्रामुळे आता अनिल देशमुखांची गच्छंती होणार, हे जवळजवळ निश्चित झाल्याचे मानण्यात येत आहे. परमबीर सिंग यांच्या पत्रानुसार, अनिल देशमुख यांनी निलंबित एपीआय सचिन वाझे यांना 100 कोटी रुपयांच्या वसुलीचं टार्गेट दिलं होतं. अँटिलिया प्रकरण, त्यात सचिन वाझेंची भूमिका यामुळे गृहखात्यावर टीकेची झोड उठत असून हा प्रकार महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळिमा फासणारा असल्याची भावना व्यक्त होत आहे.

शरद पवार देशमुखांवर नाराज!

‘आज तक’ने दिलेल्या वृत्तानुसार, शिवसेनेच्या सूत्रांनी सांगितले की, अनिल देशमुख एक-दोन दिवसांत गृहमंत्रिपदाचा राजीनामा देऊ शकतात. अनिल देशमुख यांनी शुक्रवारी शरद पवार यांची दिल्ली येथे भेट घेतली होती. यावेळी त्यांनी शरद पवार यांना अँटिलिया प्रकरणातील घडामोडींची माहिती दिली होती. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दोन वरिष्ठ नेत्यांमधील ही बैठक तब्बल 2 तास चालली.

सचिन वाझेप्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अनिल देशमुख यांना शुक्रवारी दिल्लीत बोलावले होते. सूत्रांच्या माहितीनुसार असे सांगितले जात आहे की, दिल्लीत झालेल्या बैठकीदरम्यान शरद पवार यांनी अनिल देशमुख यांना गृह मंत्रालय सोडण्यास सांगितले होते. शरद पवार यांनी अनिल देशमुख यांना म्हटले की, तुमच्याविरोधात अनेक तक्रारी आहेत, तुम्हाला हटवावे लागणार आहे.

दरम्यान, यापूर्वी बुधवारी शरद पवार यांना जेव्हा अनिल देशमुख यांना गृहमंत्रिपदावरून काढून टाकले जाणार काय, असे विचारले असता ते म्हणाले की, ही माझ्यासाठी बातमी आहे. शरद पवार म्हणाले होते की, राज्य सरकारवर या प्रकरणाचा परिणाम होईल असे मला वाटत नाही. पण परमबीर सिंग यांच्या आरोपानंतर अनिल देशमुख यांच्या कार्यशैलीबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत आणि शरद पवार यांनी गृहमंत्रिपदावरून पायउतार होण्यास सांगितले असल्याचेही सूत्रांकडून समजते.

कारणे ज्यांमुळे होऊ शकते अनिल देशमुखांची गच्छंती

# परमबीर सिंग यांनी थेट मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रानुसार, अनिल देशमुख यांनी निलंबित एपीआय सचिन वाझे यांना 100 कोटी रुपयांच्या वसुलीचं टार्गेट दिलं होतं. अँटिलिया प्रकरण, त्यात सचिन वाझेंची भूमिका यामुळे गृहखात्यावर टीकेची झोड उठत असून हा प्रकार महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळिमा फासणारा असल्याची भावना व्यक्त होत आहे.

# निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचं नाव स्फोटके प्रकरणात आले आहे, यामुळे अनिल देशमुख यांना गृहखाते सांभाळता न आल्याची भावना शरद पवारांची असल्याचे वृत्त अनेक माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे.

# अँटिलिया प्रकरण, सचिन वाझे यांची भूमिका, मनसुख हिरेन हत्या या सर्व बाबींमुळे मुंबई पोलीस आणि गृहखात्याची बदनामी झाली.

# सचिन वाझे यांना शिवसेना वाचवत असल्याचा आरोप होत असताना गृहखातं मात्र राष्ट्रवादीकडे आहे. यामुळे आधीपासूनच या खात्याकडेही बोट दाखवलं जातंय. आता परमबीर सिंग यांच्या पत्रामुळे तर गृहखात्याची लक्तरे वेशीला टांगल्याची भावना व्यक्त आहे. यासर्व कारणांमुळे अनिल देशमुखांची गच्छंती जवळपास निश्चित मानली जात आहे.


हेही वाचा


Parambir Singh Letter: Anil Deshmukh’s conviction against corruption is inevitable! May give Resignation for these reasons

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*