Paramavir singh letterbomb; पवार साहेब को गुस्सा क्यों आता है… सत्य टोचले, पवार गडबडले आणि संतापून पत्रकारांना म्हणाले, “इनफ इज इनफ”

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : परमवीर सिंग – अनिल देशमुख प्रकरणात अनिल देशमुखांचे समर्थन करताना ज्येष्ठ नेते शरद पवार आज दिल्लीतील पत्रकार परिषदेत गडबडले… पत्रकारांच्या प्रश्नांच्या सरबत्तीला उत्तरे देताना त्यांच्यातल्या मुत्सद्द्याची अक्षरशः तारांबळ उडालेली पाहायला मिळाली.Paramavir singh letterbomb; sharad pawar got angry in press conference in new delhi

पवारांच्या प्रेस कॉन्फरन्सचा हा विडिओ महाराष्ट्रासह देशात चांगलाच व्हायरल झाला. त्याचे झाले असे… पवारांनी दिल्लीत ६ जनपथ या आपल्या निवासस्थानी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुखांच्या समर्थनार्थ पत्रकार परिषद घेतली. 

त्यात अनिल देशमुखांच्या क्वारंटाइनच्या तारखेवरून पत्रकारांनी पवारांना उलट – सुलट प्रश्न विचारून अक्षरशः घेरले. त्यांच्या या घेरण्यामुळे सुरूवातीला पवार गडबडले आणि नंतर ते पत्रकारांवरच संतापले… आणि गाडी कोणी ठेवली, ज्याची हत्या झाली, त्याच्या मागे कोण आहे,

या महत्त्वाच्या प्रश्नांवरून तुम्ही महत्त्वाचे प्रश्न डायव्हर्ट करता आहात, असे ते पत्रकारांना उद्देश्यून म्हणाले… तरीही पत्रकारांच्या प्रश्नांची सरबत्ती थांबत नाही हे पाहून पवार संतापले आणि शेवटी इनफ इज इनफ असे म्हणाले.

पवारांच्या या गड़बडीचा आणि संतापाचा विडिओ महाराष्ट्रात चांगलाच व्हायरल होऊन त्यावर सोशल मीडियात जोरदार चर्चा सुरू झाली… पवार साहब को गुस्सा क्यों आता है… सारखी मिम्स तयार होऊन व्हायरल झाली आहेत.

Paramavir singh letterbomb; sharad pawar got angry in press conference in new delhi

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*