परमबीर सिंग सचिन वाझे प्रकरणाच्या चौकशीतला अडथळा होते…!!; गृहमंत्री अनिल देशमुखांची “पॉझिटिव्ह” भाषेत ट्विट करून कबुली!!

वृत्तसंस्था

मुंबई – मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून परमबीर सिंग यांची बदली केल्याने आता सचिन वाझे प्रकरणाचा तपास विनाअडथळा होईल, अशा आशयाचे पॉझिटिव्ह भाषेत ट्विट करून गृहमंत्री अनिल देशमुखांनी एक प्रकारे परमबीस सिंग हे चौकशीतला अडथळाच असल्याची कबुली दिली आहे. Param Bir Singh has been transferred from the post of Mumbai Police Commissioner so that investigation can be done without any obstruction

या ट्विटमध्ये अनिल देशमुख म्हणतात, की “एनआयए आणि एटीएस सचिन वाझे प्रकरणाचा तपास योग्य प्रकारे करत आहेत. त्यानुसार कारवाई केली जाईल. परमबीर सिंग यांची मुंबई पोलीस आयुक्तपदावरून बदली करण्यात आली आहे, जेणेकरून कोणत्याही अडथळ्याशिवाय तपास होईल.” असं अनिल देशमुख यांच्या या ट्विटची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. सचिन वाझेंना शिवसेनेचा उघड पाठिंबा होता. तो दिसूनही आला. पण परमबीर सिंग यांच्या मागे नेमके कोण होते… अनिल देशमुखांना या ट्विटमधून नेमके काय सूचवायचे आहे, याची चर्चा सोशल मीडियावर लगेच सुरू झाली.



दरम्यान राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) सचिन वाझे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी बुधवारी शोधाशोध केली असून रात्रीपर्यंत सुरू असलेल्या या कारवाईत पथकाच्या हाती काय लागले याबाबत एनआयएने माहिती दिली नाही. वाझे वापरात असलेल्या मर्सिडीज गाडीतून हस्तगत करण्यात आलेली पाच लाख रुपयांपेक्षा जास्त रोकड, नोटा मोजण्याचे यंत्र, कपडे आणि ज्वलनशील द्रव्याच्या बाटल्यांबाबत एनआयएने वाझे यांच्याकडे चौकशी केल्याचे समोर आले आहे.

Param Bir Singh has been transferred from the post of Mumbai Police Commissioner so that investigation can be done without any obstruction

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*