केव्हिन पीटरसनने मानले भारताचे आभार ; ‘ प्रिय भारत ‘ म्हणताच पाकिस्तानी आणि ईस्लामवाद्यांचा जळफळाट

इंग्लंडच्या माजी क्रिकेटपटूने कोविड -19 लस दिल्याबद्दल ‘प्रिय देश’ म्हणत भारताचे आभार मानल्यानंतर त्यांना पाकिस्तानी आणि कट्टर ईस्लामवाद्यांनी ट्रोल केले.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू केव्हिन पीटरसन यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी दक्षिण आफ्रिकेत पोहोचलेल्या इंडिया कोविड – 19 लसीची छायाचित्रे शेअर केल्यावर त्यावर प्रतिक्रिया दिली.Pakistani and islamists attack pitersson for saying BELOVED cOUNTRY


पिटरसन यांनी भारताबद्दल कृतज्ञता व्यक्त करत प्रिय देश असे संबोधले. मात्र हि गोष्ट कट्टर ईस्लामवाद्यांना रुचली नाही. त्यांनी पीटरसन वर आगपाखड करत नको त्या कमेंट्स केल्या आहेत. त्याउलट भारतीय जनतेने यासाठी पीटरसनचे आभार व्यक्त केले आहेत.

या क्रिकेटपटू सुपरस्टारचा जन्म दक्षिण आफ्रिकेत झाला होता पण नंतर ते इंग्लंडला गेले.आणि इंग्लडकडूनच क्रिकेट खेळत राहिले.केईन पीटरसन यांनी जयशंकर यांच्या ट्विटला उत्तर देऊन म्हटले की, “भारतीय औदार्य आणि दयाळूपणा प्रत्येक दिवसात अधिकाधिक वाढत आहे  , प्रिय देश! “

Pakistani and islamists attack pitersson for saying BELOVED cOUNTRY

कोव्हिड- 19 लसीचा अनेक देशांमध्ये भारताकडून पुरवठा करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच देशांतून भारताचे कौतुक होत आहे. मात्र अशा कृतीतून पाकिस्तानचा नेहमी प्रमाणे भारतावर जळफळाट स्पष्ट दिसून येतो.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*