सीमेवर शांतीची विनवणी करत पाकिस्तान नरमला, हॉटलाईनवर साधला भारताशी संपर्क

भारतीय सीमेवर सातत्याने कुरापती काढणाऱ्या पाकिस्तानने चीनकडून चांगलाच धडा घेतला आहे. आक्रमणाचा प्रयत्न झाल्यास भारताकडून जशास तसे उत्तर दिले जाते हे लक्षात आल्याने पाकिस्तान चांगलाच नरमला आहे. भारताशी हॉटलाईनवर संपर्क साधून पाकिस्तानने एलओसीवर शांतीची विनवणी केली.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भारतीय सीमेवर सातत्याने कुरापती काढणाऱ्या पाकिस्तानने चीनकडून चांगलाच धडा घेतला आहे. आक्रमणाचा प्रयत्न झाल्यास भारताकडून जशास तसे उत्तर दिले जाते हे लक्षात आल्याने पाकिस्तान चांगलाच नरमला आहे. भारताशी हॉटलाईनवर संपर्क साधून पाकिस्तानने एलओसीवर शांतीची विनवणी केली. Pakistan requested peace on LOC

भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांच्या मिलिट्री ऑपरेशन्सच्या डायरेक्टर जनरलन फोनवर चर्चा केली आणि सीमेवर शांती प्रस्थापित करण्यासाठी सहमती बनविली. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर शांतता निर्माण करण्यासाठी पाकिस्तानने सर्व करार आणि शस्त्रसंधीचे कडक पालन करणार असल्याचे सांगितले. याला भारतानेही सहमती दिली आहे. ही शस्त्रसंधी 24-25 फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून लागू होणार आहे. दोन्ही देशांच्या जनरलनी एओसीसह सर्व सीमाभागा स्वतंत्र आणि सौहार्दपूर्ण वातावरण ठेवण्यास सहमती दर्शविली.एओसीबाबत जे काही याआधी समझोते झाले आहेत ते पाळण्याचे आश्वासन पाकिस्तानने दिले आहे. कोणतीही अफवा किंवा गैरसमज दूर करण्यासाठी हॉटलाईनवर चर्चा करण्याबाबतही दोन्ही जनरलनी सहमती दर्शविली आहे. याचबरोबर बॉर्डरवर फ्लॅग मिटिंग घेण्याचे ठरविले आहे.

पाकिस्तानला ही उपरती चीनला भारताने शिकविलेल्या धड्यानंतर आली आहे. गलवान व्हॅलीत चीनच्या सैन्याने भारतीय सैनिकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी भारतीय सैन्याने जोरदार प्रत्युत्तर दिले. ४५ चीनी सैनिकांचा यामध्ये मृत्यू झाला. त्यानंतर भारत आणि चीनमध्ये चर्चेच्या अनेक फेºया होऊन चीनने माघार घेतली.

चीनसारख्या बलाढ्य देशाची भारताने केलेली अवस्था पाकिस्तानने पाहिली आहे. आत्तापर्यंत भारताशी कुरापती काढताना बाका प्रसंग आल्यास चीन आपल्याला मदत करेल असे पाकिस्तानला वाटत होते. मात्र, चीनला मिळालेल्या चोख प्रत्युत्तरानंतर चीनने भारताशी समझौत्याची भाषा सुरू केली आहे. त्यामुळे पाकिस्तानचा मुख्य आधारच तुटला आहे. त्यामुळे पाकिस्तान शांतीची भाषा करू लागला आहे.

Pakistan requested peace on LOC

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*