पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या विमानाला हवाई क्षेत्राचा वापर करण्याची परवानगी ; श्रीलंका दौऱ्यासाठी भारत सरकारचे औदार्य

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना श्रीलंका दौऱ्याला जात यावे, यासाठी भारतीय हवाई क्षेत्राचा वापर करण्याची परवानगी भारत सरकारने दिली आहे. Pakistan Prime Minister Imran Khan’s plane allowed to use airspace

इम्रान खान मंगळवारी (ता.23) श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहेत. काश्मीर येथे मानवी हक्कांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप करून पाकिस्तानने 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अमेरिका आणि सौदी अरेबिया येथे जाण्यासाठी हवाई क्षेत्राचा वापर करण्यास बंदी घातली होती.वास्तविक कोणत्याही देशाच्या प्रमुखाला कोणत्याही देशाच्या हवाई क्षेत्राचा वापर करण्यास परवानगी असते. परंतु, या परंपरेचे पालन पाकिस्तानने केले नाही. अडमुठे धोरण राबविले होते. परंतु आता भारताने हवाई क्षेत्राचा वापर करण्याची परवानगी इम्रान खान यांना देऊन या परंपरेचे पालन केले आहे.

Pakistan Prime Minister Imran Khan’s plane allowed to use airspace

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*