पाकिस्तानसारखा देश मानवाधिकार परिषदेत असणे सहन करणे अशक्य, यूएन वॉचची टीका


ईशनिंदा स्वातंत्र्याच्या नावाखाली सहन केली जाणार नाही’, असे पाकिस्तान सरकारने जाहीर केले होते. ही भूमिका असलेला पाकिस्तान नावाचा देश संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेत असणे हे सहन करणे अशक्य असल्याचे मत ‘यूएन वॉच’ने केले आहे. (pakistan latest news)


विशेष प्रतिनिधी

न्यूयॉर्क : ईशनिंदा स्वातंत्र्याच्या नावाखाली सहन केली जाणार नाही’, असे पाकिस्तान सरकारने जाहीर केले होते. ही भूमिका असलेला पाकिस्तान नावाचा देश संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेत असणे हे सहन करणे अशक्य असल्याचे मत ‘यूएन वॉच’ने केले आहे.pakistan latest news

पाकिस्तान सरकारच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन गुरुवारी ५ नोव्हेंबर रोजी एक ट्वीट करण्यात आले. या ट्वीटमध्ये ‘ईशनिंदा स्वातंत्र्याच्या नावाखाली सहन केली जाणार नाही’, असे पाकिस्तान सरकारने जाहीर केले होते. पाकिस्तान सरकारच्या या ट्वीटवर ‘यूएन वॉच’ने ७ नोव्हेंबर रोजी ट्वीट केले.

‘यूएन वॉच’ने आपल्या ट्वीटमध्ये पाकिस्तान सरकारच्या भूमिकेवर कडाडून टीका केली. मानवाधिकांच्या बाबतीत प्रत्येक देशातील स्थितीचा नियमित आढावा घेणाऱ्या ‘यूएन वॉच’ या आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्यरत असलेल्या स्वयंसेवी संस्थेने पाकिस्तान सरकारच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली. ट्वीट करुन त्यांनी नाराजी जाहीर केली.

पाकिस्तानमध्ये इस्लामशी संबंधित पवित्र गोष्टींवर टीका केल्यास ईशनिंदा कायद्याने कारवाई होऊ शकते. या कायद्यानुसार दोषी आढळल्यास जास्तीत जास्त कठोर अशी फाशीची शिक्षा देण्याबाबतही तरतूद आहे. या कायद्याचा गैरवापर करुन पाकिस्तानमध्ये अनेक प्रगत विचारांच्या नागरिकांना संपवून टाकण्याचा प्रकार घडला आहे.

pakistan latest news

आता ‘यूएन वॉच’ने ईशनिंदेबाबतच्या पाकिस्तान सरकारच्या भूमिकेविषयी नाराजी जाहीर केली. पाकिस्तान सरकारची ईशनिंदेबाबतची भूमिका स्वीकारू शकत नाही आणि सहन करू शकत नाही, असे ‘यूएन वॉच’ने ट्वीट करुन सांगितले.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती