वृत्तसंस्था
काबूल :पाकिस्तानने सिमेवरून अफगाणिस्तानच्या हद्दीत 50 रॉकेट डागल्याचे वृत्त आहे. पाकिस्तानच्या या कृतीमुळे अफगाणिस्तानाला धक्का बसला आहे. अशा प्रकारची आक्रमक कृती पाकिस्तानने का केली ? असा प्रश्न तेथील सरकारला पडला. Pakistan invades Afghanistan 50 rockets Property damage
पाक अफगाण सीमेवरील शेल्टन जिल्ह्यातील कुनार प्रांतात ही रॉकेट पडली आहेत. काल रात्री अनेक रॉकेट घोंगावत अचानक कोसळल्याने हाहाकार उडाला असून मालमत्तेचे नुकसान झाले.
स्थानिक रहिवाशांची घरे या हल्ल्यात पडली असून त्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. याबाबतच्या वृत्ताला राज्यपाल मोहम्मद इकबाल सैद यांनी दिली.