कंगाल पाकिस्तान आता जिन्नांचा ‘वारसा’ ठेवणार गहाण, 500 अब्ज डॉलर्सच्या कर्जासाठी इम्रान सरकारची तयारी

Pakistan Imran Khan Govt Now Mortgaging Biggest Park To Get 500 Billion Loan

पाकिस्तानची अस्वस्थ आता एवढी बिकट झाली आहे की, गर्तेतून बाहेर येण्यासाठी त्यांना पाकचे संस्थापक मोहम्मद अली जिन्ना यांचे प्रतीक गहाण ठेवण्याची वेळ आली आहे. पाकच्या इम्रान सरकारने 500 अब्ज डॉलर्सच्या कर्जासाठी मोहम्मद अली जिन्ना यांच्याची स्मृती म्हणून ओळखल्या जाणार्‍या या उद्यानाच्या लिलावाचा विचार करत आहे. Pakistan Imran Khan Govt Now Mortgaging Biggest Park To Get 500 Billion Loan


विशेष प्रतिनिधी

इस्लामाबाद : पाकिस्तानची अस्वस्थ आता एवढी बिकट झाली आहे की, गर्तेतून बाहेर येण्यासाठी त्यांना पाकचे संस्थापक मोहम्मद अली जिन्ना यांचे प्रतीक गहाण ठेवण्याची वेळ आली आहे. पाकच्या इम्रान सरकारने 500 अब्ज डॉलर्सच्या कर्जासाठी मोहम्मद अली जिन्ना यांच्याची स्मृती म्हणून ओळखल्या जाणार्‍या या उद्यानाच्या लिलावाचा विचार करत आहे. पाकिस्तानी वेबसाइट डॉनच्या वृत्तानुसार, इम्रान सरकार इस्लामाबादमधील सर्वात मोठे उद्यान तब्बल 500 अब्जांचे कर्ज घेण्यासाठी तारण ठेवण्याचा विचार करत आहे.

हे उद्यान गहाण ठेवण्याचा प्रस्ताव मंगळवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. महत्त्वाचे म्हणजे या पार्कचे नाव आहे ‘फातिमा जिन्ना पार्क’. मदार-ए-मिल्लत फातिमा जीना पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिन्ना यांच्या भगिनी होत्या. एफ -9 पार्क (फातिमा जिन्ना पार्क) हे 759 एकर जागेत विस्तारलेले सार्वजनिक उद्यान आहे. हे पार्क पाकिस्तानमधील सर्वात मोठ्या हिरव्यागार क्षेत्रांपैकी एक आहे.‘डॉन’च्या वृत्तानुसार, ही बैठक व्हिडीओ लिंकद्वारे होईल, जी इम्रान खान यांचे निवासस्थान आणि कॅबिनेट विभागाच्या समिती आयोजित करण्यात येणार आहे. या प्रस्तावावर मंगळवारी चर्चा होईल. वृत्तानुसार, आर्थिक संकटाला सामोरे जाणाऱ्या इम्रान सरकारने कर्ज मिळवण्यासाठी हे एफ -9 पार्क गहाण ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

Pakistan Imran Khan Govt Now Mortgaging Biggest Park To Get 500 Billion Loan

येथे नोंद घेण्यासारखे आहे की, पाकच्या कॅपिटल डेव्हलपमेंट अथॉरिटीने यासंदर्भात यापूर्वीच ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे. अशी प्रसिद्ध स्थळे गहाण ठेवण्याची पाकिस्तानात परंपरा राहिलेली आहे. यापूर्वी विविध सरकारांच्या कार्यकाळात अनेक संस्था, इमारती आणि रस्ते कर्जासाठी गहाण ठेवण्यात येणार आहे.

Pakistan Imran Khan Govt Now Mortgaging Biggest Park To Get 500 Billion Loan

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था