पाकिस्तानसाठी तोफखान्याची हेरगिरी करणारा नाशिकमधून ताब्यात, सीमेवर तणावपूर्ण वातावरण असतांना प्रकरण उजेडात

विशेष प्रतिनिधी

नाशिक : सीमेवर भारत-चीन यांच्यातील तणावपुर्ण वातावरण कायम असतांना पाकिस्तानातून भारतीय लष्कराच्या हेरागिरीचे प्रकरण उजेडात आले आहे. ठेकेदाराचा मजूर म्हणून कार्यरत असलेल्या एकाने नाशिकरोड तोफखान्यातील संवेदनशील छायाचित्र पाकिस्तानला पाठविल्याचे उघडकीस आले.

लष्करातील गोपनीय विभागावर पाळत

लष्कराच्या गोपनीय विभागाने पाळत ठेवून बिहारमधील संशयिताच्या मुसक्या आवळून पोलसांच्या ताब्यात दिले. संजीवकुमार (वय २१,रा.आलापूर, पी .सुनबरसा.जि.गोपालराज, बिहार) असे हेरगिरी करणाऱ्या संशयिताचे नाव असून तो देवळाली कॅम्प रेल्वे स्थानक परिसरात चिंतामण बस स्टॉपजवळील पडक्या शेडमध्ये राहून पाकिस्तानसाठी हेरगिरी करीत होता.

व्हॉटसअँप ग्रुपद्वारे थेट पाकिस्तानाला फोटो सेंड

शुक्रवारी(ता.२) रात्री आठला तोफखाना केंद्रातील एमएच गेट भागात लष्कराच्या प्रतिबंधित भागातील छायाचित्र काढून ते व्हॉटसअँप ग्रुपद्वारे थेट पाकिस्तानला पाठवितांना त्याला पकडण्यात आले. दोन दिवस लष्करी प्रशासनाने कसून चौकशी केल्यानंतर शनिवारी(ता.३) त्यांच्याविरोधात लष्करातर्फे देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. आर्मि इन्टलिजन्सचे यश तोफखाना केंद्रात विविध कामे ठेकेदारांकडून करून घेतली. जातात. संशयित संजीवकुमार हा अशाच ठेकेदारांचा मजूर म्हणून तोफखाना केंद्रात यायचा.

मुसक्या आवळून पोलिसांच्या स्वाधीन

सायंकाळी काम सुटल्यानंतर मजूर परतायचे,पण हा मात्र उशिरापर्यत तोफखान्यात रेंगाळायचा, बाहेरील व्यक्तींना मोबाईल वापराला प्रतिबंध असतांना त्यांच्याकडे मोबाईल असल्याचे लक्षात आल्याने आर्मी इन्टलिअन्स त्यांच्यावर पाळत ठेवून होते. शुक्रवारी सायंकाळी त्याने पाकिस्तानला छायाचित्र पाठविल्यानंतर काही वेळातच त्यांच्या मुसक्या आवळून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*