वृत्तसंस्था
श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील राजुरी जिल्ह्यात पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान हुतात्मा झाला. नियंत्रण रेषेवर पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करून हा गोळीबार केला होता.Pakistan by Arms embargo violation Indian soldier shot dead
शिपाई लक्ष्मण,असे हुतात्मा झालेल्या जवानाचे नाव आहे. राजुरी जिल्ह्यातील सुंदरबन परिसरात पाकिस्तानी सैनिकांनी अचानक गोळीबार केला. त्याला भारतीय जवानांनी चोख उत्तर दिले. या चकमकीत शिपाई लक्ष्मण गंभीर जखमी झाला. पण, त्याला विरमरण आले.
पाकिस्तानने नवीन वर्षात चार वेळा नियंत्रण रेषेवरीन बेछूट गोळीबार करत शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे.त्यात आतापर्यंत 4 जवान हुतात्मा झाले आहेत, अशी माहिती संरक्षण विभागाच्या प्रवक्त्याने दिली.