पाकिस्तानात मुलींना जीन्स, स्लिव्हलेस, टी-शर्ट घालण्यास बंदी


पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील हजारा विद्यापीठानं विद्यार्थी आणि शिक्षक, प्राध्यापकांसाठी ड्रेस कोड लागू केला आहे. विद्यापीठानं मुलींना जीन्स, स्लिवलेस आणि टी-शर्ट घालण्यास बंदी केली आहे. मुलांना बाळी घालणं आणि केस वाढवण्यावर प्रतिबंध घालण्यात आला आहे. Pakistan bans girls from wearing jeans, sleeveless, T-shirts


वृत्तसंस्था

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील हजारा विद्यापीठानं विद्यार्थी आणि शिक्षक, प्राध्यापकांसाठी ड्रेस कोड लागू केला आहे. विद्यापीठानं मुलींना जीन्स, स्लिवलेस शर्ट आणि टी-शर्ट घालण्यास बंदी केली आहे. मुलांना बाळी घालणं आणि केस लांब वाढवण्यावर प्रतिबंध घालण्यात आला आहे. Pakistan bans girls from wearing jeans, sleeveless, T-shirts

विद्यार्थ्यांसह प्राध्यापक आणि प्राध्यापिकांनाही हा नियम लागू करण्यात आला आहे. महत्वाची बाब म्हणजे पाकिस्तान सरकारनं या निर्णयामुळे विद्यार्थी अभ्यासाकडे जास्त लक्ष देतील, असे म्हटले आहे.विद्यापीठानं प्रसिद्ध केलेल्या नियमावलीनुसार विद्यार्थ्यांना जीन्स, टी-शर्ट, हाफ जीन्स आणि मेकअप करुन विद्यापीठात येण्यास मनाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर महागड्या हँडबॅग घेऊन आणि अलंकार घालून विद्यापीठात येण्यावर बंदी घालण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना फक्त शाल घेऊन, अबाया किंवा सलवार-कमीज अशा साध्या पेहरावात विद्यापीठात येण्यास सांगितलं आहे.

प्रशासनानं विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना शॉर्ट्स, चप्पल, मोठे केस, पोनीटेल, कानात बाळी घालण्यास प्रतिबंध केला आहे. त्याचबरोबर सभ्यरीतीने दाढी ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मुलांनी आणि शिक्षकांनी फक्त पॅन्ट-शर्ट किंवा कुर्ता-पायजमा घालण्यास प्राधान्य द्यावे, असंही बजावण्यात आलं आहे. विद्यापीठाच्या या नियमावलीवरुन पाकिस्तानात सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु असून विद्यापीठ व सरकारवर टीका केली जात आहे.

Pakistan bans girls from wearing jeans, sleeveless, T-shirts

विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रीत करावं यासाठी ड्रेस कोड लागू करण्यात आल्याचं खैबर पख्तूनख्वा सरकारचे प्रवक्ते कामरान बंगश यांनी म्हटलंय. विद्यार्थ्यांच्या ड्रेस कोड बाबत विद्यापीठांनाच सर्व अधिकार देण्यात आले आहेत. हा निर्णय गरीब आणि श्रीमंत विद्यार्थ्यांमधील दरी कमी करतानाच, त्यांच्यातील आणि शिक्षकांमधील स्पर्धा संपवेल, असंही बंगश यांनी म्हटलंय.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती