Padalkar Critisizes Sharad Pawar, inaugurates statue of Ahilya Devi before Pawar In Jejuri

गोपीचंद पडळकर म्हणाले, भ्रष्टाचारी शरद पवारांचे हात पुतळ्याला लागणे हा अहिल्यादेवींचा अवमान, पवारांआधीच उरकले पुतळ्याचे उद्घाटन

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जेजुरी येथील पुतळ्याचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत मेंढपाळाच्या हस्ते आज पहाटे उद्घाटन करण्यात आले. वास्तविक, शरद पवार यांच्या हस्ते या पुतळ्याच्या उद्घाटनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. परंतु आमदार पडळकर यांनी त्याआधीच पहाटेच कार्यकर्त्यांसमवेत जेजुरी गड गाठून मेंढपाळाच्या हस्ते पुतळ्याचे उद्घाटन केले आहे. Padalkar Critisizes Sharad Pawar, inaugurates statue of Ahilya Devi before Pawar In Jejuri


विशेष प्रतिनिधी

जेजुरी : राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जेजुरी येथील पुतळ्याचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत मेंढपाळाच्या हस्ते आज पहाटे उद्घाटन करण्यात आले. वास्तविक, शरद पवार यांच्या हस्ते या पुतळ्याच्या उद्घाटनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. परंतु आमदार पडळकर यांनी त्याआधीच पहाटेच कार्यकर्त्यांसमवेत जेजुरी गड गाठून मेंढपाळाच्या हस्ते पुतळ्याचे उद्घाटन केले आहे.

शुक्रवारी पहाटेच आमदार गोपीचंद पडळकर यांनी कार्यकर्त्यांसह जेजुरी गड गाठला. शरद पवार हे भ्रष्टवादी नेते असून त्यांनी आमचे दैवत अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला हातही लावू नये, अशी टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली.

पुढे बोलताना पडळकर म्हणाले की, अखंड भारताचे दैवत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा पुतळा जेजुरी संस्थानाने उभारला. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी उपेक्षित समुदायासाठी मोठं काम केलं आहे. त्यांचा पुतळा उभारण्याचं चांगलं काम संस्थाननं केलं आहे. या पुतळ्याचं अनावरण उद्या शरद पवार यांच्या हस्ते करण्याचं ठरवण्यात आलंय; परंतु महाराष्ट्रातील आमच्यासारख्या अनेक तरुणांचं म्हणणं होतं की, शरद पवार यांच्यासारख्या भ्रष्टाचारी, वाईट प्रवृत्तीच्या हस्ते उद्घाटन होणं हा अहिल्यादेवींचा अपमान आहे. आमचा पुतळा अनावरणाला विरोध नाही; मात्र भ्रष्ट माणसाचे हात अहिल्यादेवींच्या पुतळ्याला लागू नयेत, शरद पवारांना माझं आवाहन आहे की, तुम्ही या पुतळ्याचं उद्घाटन करू नये.ते म्हणाले की, शरद पवारांनी अहिल्याबाईंच्या पुतळ्याला हात लावताना विचार करावा. कारण त्यांच्या आणि अहिल्याबाई यांच्या विचारांत मोठी तफावत आहे. त्यामुळं आम्ही आज या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्याबाई यांच्या पुतळ्याच्या पायावर माल्यार्पण करून उद्घाटन झालं, असं जाहीर करतो, असं पडळकर यांनी म्हटलं.

Padalkar Critisizes Sharad Pawar, inaugurates statue of Ahilya Devi before Pawar In Jejuri

दरम्यान, या घटनेनंतर शासकीय कामात अडथळा, जमावबंदीचे कारण पुढे करत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर जेजुरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जेजुरी पोलिसांनी स्वतःहून हा गुन्हा दाखल केला हे विशेष!

Padalkar Critisizes Sharad Pawar, inaugurates statue of Ahilya Devi before Pawar In Jejuri

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*