नरेंद्र मोदींच्या आत्मनिर्भर भारतला ऑक्सफर्ड डिक्शनरीकडून सलाम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारतचा नारा दिला आणि संपूर्ण देशाने त्यासाठी प्रयत्न सुरू केले. सामान्यांच्या रोजच्या वापरातील हा शब्द बनला आहे. ऑक्सफर्ड डिक्शनरीकडूनही याला सलाम करण्यात आला असून २०२० मधील हिंदी भाषेतील शब्द म्हणून गौरव करण्यात आला आहे.Oxford Dictionary salutes Narendra Modi’s self-reliant India


प्रतिनिधी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारतचा नारा दिला आणि संपूर्ण देशाने त्यासाठी प्रयत्न सुरू केले. सामान्यांच्या रोजच्या वापरातील हा शब्द बनला आहे. ऑक्सफर्ड डिक्शनरीकडूनही याला सलाम करण्यात आला असून २०२० मधील हिंदी भाषेतील शब्द म्हणून याचा गौरव करण्यात आला आहे.ऑक्सफर्ड हिंदी शब्द याचा अर्थ वर्षभरात लोकांकडून सातत्याने वापरला गेलेला शब्द, लोकांची मानसिकता बदलणारा शब्द आणि या शब्दाचे सांस्कृतिक महत्व असल्याने खूप काळपर्यंत तो टिकून राहण्याची शक्यता असते.आत्मनिर्भर भारत हा शब्द या सर्व कसोट्यांवर टिकणारा असल्याने कृतिका अग्रवाल, पूनम निगम सहाय आणि इमोगन फॉक्सेल यांच्या समितीने ही घोषणा केली आहे.

ऑक्सफर्ड लॅंग्वेजने प्रसिद्ध केलेल्या घोषणेत म्हटले आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनावर उपाय योजनेसाठी पॅकेजची घोषणा केली होती. या जागतिक महामारीच्या काळात अर्थव्यवस्थेला नवी दिशा देण्यासाठी त्याचबरोबर व्यक्ती आणि समाजालाही आत्मनिर्भर बनण्याचा नारा दिला होता.

त्यानंतर भारतीय समाजाच्या सार्वजनिक जीवनात आत्मनिर्भर भारत शब्द एक विशेषण बनला. त्याचा वापर वाढला. या प्रेरणेतूनच भारतामध्ये कोरोनावरील लसही आली. प्रजासत्ताकदिनी आत्मनिर्भर भारतचे दर्शन घडविण्यासाठी एक शोभायात्राही काढण्यात आली होती.

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस इंडियाचे प्रबंध संचालक शिवरामकृष्णन वेंकटेशन यांनी सांगितले की आत्मनिर्भर भारत शब्दाला सर्वच क्षेत्रातील लोकांमध्ये एक ओळख मिळाली आहे. लोकांनी आत्मनिर्भर भारतची घोषणा कोरोना संकटामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर शस्त्र म्हणून पाहायला सुरूवात केली.यापूर्वी २०१७ साली आधार, २०१८ मध्ये नारी शक्ती आणि २०१९ मध्ये संविधान या हिंदी शब्दांना ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये स्थान मिळाले होते.

Oxford Dictionary salutes Narendra Modi’s self-reliant India

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*