ओवैसींचे आमदार नितीशकुमारांना भेटले; पण राजकीय बळ कोणाला? आणि धक्का कोणाला?, मुस्लिम आमदार खेचण्यामागे राजकारण काय?


वृत्तसंस्था

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीत चांगलं यश मिळवणाऱ्या एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या पाच आमदारांनी मुख्यमंत्री नितीशकुमार यांची भेट घेतल्यानंतर जदयूचे बळ वाढण्याची चर्चा सुरू झाली. पण नेमके बळ कोण कोणाला देणार आणि धक्का कोणाला बसणार यावर तर्क – वितर्क लढवले जात आहेत. Owaisi MLA meets Nitish Kumar; But who has political power?

बसपच्या एकमेव आमदाराने जयदूमध्ये प्रवेश केल्याने जदयू आमदारांचे विधानसभेतले बळ एका आमदाराने वाढले. त्यात जर ओवैसींच्या पाच आमदारांची बाहेरून पाठिंब्याची शक्यता जरी वाढली तरी जदयूचे राजकीय बळ राज्यात वाढण्याची शक्यता व्यक्त होते आहे. त्याचा धक्का नुकताच विधानसभेत पहिल्या नंबराचा पक्ष बनलेल्या भाजपला बसण्याची शक्यता आहे.एमआयएमचे बिहारचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार अख्तर उल इमाम यांच्यासह मोहम्मद अझहर असफी, शहनवाज आलम, सयद रुकुनूद्दीन आणि अझहर नियामी या पाच आमदारांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी जदयूचे नेते आणि मंत्री विजय चौधरी हे त्यांच्यासोबत होते.

सीमांचलच्या विकासासंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचे आमदार आदिल हसन यांनी सांगितले. एमआयएमचा भाजपशी राजकीय संघर्ष आहे, नितीशकुमारांशी राजकीय वाद नाही. असदुद्दीन ओवेसी हे सुद्धा नितीश कुमार यांच्याशी हात मिळवण्यास तयार होते, ते भाजपापासून दूर राहिले असते तर ते शक्य झाले असते, याची आठवण आदिल यांनी करवून दिली.

मुस्लिम आमदारांना खेचण्याचे राजकारण

  • गेल्या आठवड्यातच बसपाचे आमदार जामा खान यांनी अपक्ष आमदार सुमित सिंह यांच्याबरोबर जदयूमध्ये प्रवेश केला. तर लोजपाचे आमदार राज कुमार सिंह यांनीही नितीश कुमार यांची भेट घेतली. त्यातच आता एमआयएमचे पाच आमदारांनी नितीश कुमार यांची भेट घेतल्यानं पक्षांतराच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. तर दुसरीकडे नितीश कुमार यांच्या जदयूची एमआयएमच्या आमदारांवर नजर असल्याचीही राजकीय वर्तुळात चर्चा आहेच. त्यामुळे बिहारमध्ये दमदार पाऊल ठेवणाऱ्या असदुद्दीन ओवेसी यांना राजकीय झटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
  • मुस्लिम समाजाचे आमदार आपल्यामागे वळविण्यातून एकाच वेळी नितीशकुमार भाजपच्या वाढत्या प्रभावावर नियंत्रण ठेवू इच्छितात तर दुसरीकडे राजद आणि काँग्रेस पुरस्कृत महागठबंधनच्या वोट बँकेवरच राजकीय आघात करून त्यांना राजकीयदृष्ट्या पंगू करू इच्छितात, अशी चर्चा आहे.

Owaisi MLA meets Nitish Kumar; But who has political power?

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था