पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ओवैसींची एंट्री, ममतांवर मुस्लिमांचे शोषण करत असल्याचा आरोप

ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुसलमीन (AIMIM) पक्षाचे प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी पश्चिम बंगालचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांचा पक्ष पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. Owaisi entry in West Bengal Assembly elections


विशेष प्रतिनिधी

कोलकाता : ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुसलमीन (AIMIM) पक्षाचे प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी पश्चिम बंगालचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांचा पक्ष पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हुगळी जिल्ह्यात त्यांनी बंगाली मुस्लिमांचे धार्मिक स्थळ असलेल्या फुरफुरा शरीफचे धार्मिक नेते अब्बास सिद्दिकी यांचीही भेट घेतली आणि राज्यात त्यांच्या पक्षाच्या निवडणूक प्रचाराचा प्रमुख चेहरा होण्याविषयी बोलणी केली. यावेळी माध्यमांशी बोलतानाच त्यांनी स्पष्ट केले की त्यांचा पक्ष बंगाल विधानसभा निवडणुका लढवणार आहे.असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, त्यांचा पक्ष सर्व बाबींमध्ये अब्बास सिद्दिकी यांना पूर्ण पाठिंबा देईल. ते म्हणाले, ‘आम्ही त्यांच्याबरोबर जाऊ (अब्बास सिद्दिकी). आम्ही निवडणुका लढवू. निवडणुकीत किती जागा लढवायच्या व त्या जागा कोणत्या हे आगामी काळात निश्चित केले जाईल. दरम्यान, ओवैसी यांनी ज्यांची भेट घेतली ते धार्मिक नेते अब्बास सिद्दिकी हे ममता बॅनर्जी सरकारचे कट्टर विरोधक आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, सत्ताधारी टीएमसी मतांसाठी मुस्लिमांचे शोषण करते.

Owaisi entry in West Bengal Assembly elections

महत्त्वाचे म्हणजे असदुद्दीन ओवैसी यांनी नुकतेच म्हटले होते की, टीएमसी प्रमुख ममता बॅनर्जी यांनी आपल्या संघटनेवर आरोप करण्याऐवजी स्वत: आत्मपरीक्षण केले पाहिजे. राज्यात भाजपने लोकसभेच्या 18 जागा कशा व का जिंकल्या हे तपासून पाहा. एमआयएम भाजपची बी टीम असल्याचा ममतांचा आरोप त्यांनी फेटाळून लावला. ओवेसी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “आम्ही एक राजकीय पक्ष आहोत. आम्ही आमचे अस्तित्व सिद्ध करू आणि पश्चिम बंगालमध्ये निवडणूक लढवू.”

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*