पूजा चव्हाणच्या कुटुंबाचा आक्रोश;आईच्या वेदना अश्रूरुपाने बाहेर पडल्या

वृत्तसंस्था

मुंबई : पूजा चव्हाणच्या आत्महत्येचे प्रकरण राज्यात गाजत आहे. अजूनही कोणावर कारवाई झाली नाही. आता पूजाच अख्खं कुटुंबच महाराष्ट्रासमोर आलं असून त्यांनी आक्रोश व्यक्त केला.The outcry of Pooja Chavan family mother’s pain came out in tears

‘माझ्या पोटचा गोळा गेला…माझी मुलगी कशी होती हे मला माहीत आहे…ती धाडसी होती…मात्र तिची आता बदनामी थांबवा…पोलिस त्यांच्या पद्धतीने तपास करतील,’ असं म्हणत पूजाच्या आईनं माध्यमांसमोर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मुलीविषयी होत असलेल्या चर्चेमुळे आईला वेदना होत असून त्याच अश्रूरुपाने बाहेर पडल्याचंही पाहायला मिळालं.दरम्यान, पूजा चव्हाणच्या आत्महत्या प्रकरणात थेट शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांचं नाव आलं आहे. कारण राठोड आणि पूजा चव्हाण यांच्यात फोनवर झालेल्या कथित संभाषणाच्या ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. तसंच एकत्रित फोटोही समोर आले आहेत.

कारवाईला का होत आहे उशीर?

पूजाच्या आत्महत्येबाबत चौकशी सुरू असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. मात्र कोणावरही कारवाई झाली नाही. तसंच मुख्यमंत्र्यांनीही संजय राठोड यांना तपास पूर्ण होईपर्यंत मंत्रिपदावरून दूर होण्याच्या सूचना दिल्या नाहीत.

त्यामुळे या सगळ्या घटनेबाबत शासन आणि प्रशासन अंसवेदनशील आहे का, अशी चर्चा रंगू लागली आहे. आगामी काळात काही कारवाई होते का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 outcry of Pooja Chavan family mother’s pain came out in tears

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*