विठ्ठल-रुक्मिणी मंदिराला अर्पण मिळालेल्या जमिनींपैकी आणखी ११७ एकर भूमी परत मिळाली


विशेष प्रतिनिधी

पंढरपूर : श्री विठ्ठलाच्या चरणी भाविकांनी अर्पण केलेल्या शेकडो एकर जमिनींपैकी ११७ एकर जमीन मंदिर समितीने दळणवळण बंदीच्या काळात स्वत:च्या ताब्यात घेतल्याचे नुकतेच देवस्थान समितीने घोषित केले.Out of the land that was offered to the Vitthal-Rukmini temple another 117 acres were returned

श्री विठ्ठलाच्या कृपेमुळेच ही भूमी परत मिळाली, अशी आमची श्रद्धा आहे. असे असले तरी श्री विठुरायाची सर्व भूमी परत मिळेपर्यंत आम्ही आमचा लढा चालूच ठेवणार आहोत, असे हिंदु जनजागृती समितीचे राज्य संघटक सुनील घनवट यांनी सांगितले.

पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या सरकारनियुक्त समितीने देवस्थानाच्या संपत्तीत प्रचंड घोटाळा केल्याचे हिंदु जनजागृती समिती आणि हिंदू विधीज्ञ परिषद यांनी पुराव्यानिशी उघड केले होते. या संदर्भात हिंदु जनजागृती समितीने वेळोवेळी आंदोलनही केले होते. वर्ष २०१४ मध्ये हिंदु विधीज्ञ परिषदेच्या माध्यमातून हिंदु जनजागृती समितीने श्री विठ्ठल मंदिराच्या १२५० एकर भूमी घोटाळ्याच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.न्यायालयाने ती याचिका दाखल करून घेत त्यावर महाराष्ट्र शासन आणि मंदिर समितीला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे, तसेच न्यायालयाने तहसीलदारांची पथके तयार करून देवस्थानच्या जमिनी शोधण्याचे आदेश दिले होते. याचा परिणाम म्हणून यापूर्वी देवस्थान समितीला ९०० एकर भूमी परत मिळाली होती आणि आता ११७ एकर भूमी परत मिळाली आहे. आतापर्यंत १०१७ एकर भूमी परत मिळवण्यात यश आले आहे.

घनवट यांनी सांगितले की, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला भाविकांनी आजवर अडीच हजार एकरांपेक्षा अधिक जमीन अर्पण केली असल्याची आमच्याकडे माहिती आहे. यातील अद्याप १४०० एकर जमीन परत मिळवता आलेली नाही. मुळात इतकी वर्षे या जमिनी ताब्यात घेण्याचे काम मंदिर समितीने स्वतःहून का केले नाही? मंदिरांचे व्यवस्थापन चांगले करण्याच्या नावाखाली मंदिरांचे सरकारीकरण करायाचे, भ्रष्टाचार करायचा, हे अत्यंत गंभीर आहे. मंदिरांचे सरकारीकरण केल्याचेच हे दुष्परिणाम आहेत.

केवळ हिंदूंचीच मंदिरे धर्मनिरपेक्ष शासन ताब्यात घेते. घ्यायचीच आहेत, तर मुसलमानांच्या मशिदी आणि ख्रिस्त्यांची चर्च पण सरकारीकरण करून दाखवा ! आणि तसे करण्याची धमक नसेल, तर मंदिरांचे सरकारीकरण रद्द करा, असे आव्हानही हिंदू जनजागृती समितीने म्हटले आहे.

Out of the land that was offered to the Vitthal-Rukmini temple another 117 acres were returned

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी